सुशांत केस: ईडीच्या हाती लागला महत्वाचा पुरावा; जवळचा मित्र संदीपसिंगची चौकशी होणार?

मुंबई | अभिनेता सुशांत सिंग राजपुतने १४ जूनला वांद्रे येथील राहित्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. मात्र त्याने आत्महत्या का केली? याबाबत अजूनही ठोस कारण मिळालेले नाही.

सध्या सुशांतच्या आत्महत्येचे प्रकरण सीबीआयने ताब्यात घेतले आहे. तसेच सीबीआयने रियासह ६ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सीबीआय अजून तपास करत असून सुशांतच्या केसमध्ये रोज नवनवीन खुलासे होत आहे.

आता आणखी एक नवीन गोष्ट समोर आली आहे. ज्यामुळे सुशांतचा मित्र संदीप सिंग याचीही ईडी चौकशी करू शकते. ईडीच्या हाती एक बँक स्टेटमेंट लागली असल्याने संदीपची चौकशी होण्याची शक्यता आहे.

ईडीच्या हाती एक बँक स्टेटमेंट लागले असून यात संदीप सिंग आणि सुशांत यांच्यात पैशांचा व्यवहार झाला होता. संदीप सिंग सुशांतचा जवळच मित्र होता. त्यांनी १४ जून रोजी सर्व औपचारिकता पूर्ण केली होती.

दरम्यान, सुशांतची मैत्रीण स्मिता पारीख हिने एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती, त्यावेळी तिने संदीपबाबत भाष्य केले होते.

संदीपला कुटुंबातील कोणताही सदस्य ओळखत नाही. संदीपने सुशांतच्या सर्व वस्तू कूपर हॉस्पिटलमधून गोळा केल्या. संदीपच्या पीआरने त्याची आणि सुशांतच्या बहिणीची छायाचित्रे क्लिक केली होती.

तसेच संदीप सुशांतच्या जवळचा असेल पण खूप पूर्वी असेल अशी माहिती तिने वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत दिली होती. अशी माहिती लाईव्ह हिंदुस्थानने दिली आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.