सुशांत व रियाचे व्हाट्सअप चॅट व्हायरल; समोर येतेय पुर्णपणे वेगळीच माहिती, वाचून हैराण व्हाल

सुशांत सिंग राजपूतच्या मृत्युला दिड महिना पूर्ण झाला आहे. पण तरीही त्याला कोणीही विसरू शकले नाही. सुशांत सिंग राजपूतने १४ जुन रोजी त्याच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती.

या घटनेमूळे सर्वांनाच धक्का बसला होता. मुंबई पोलिसांनी सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्या आत्महत्येप्रकरणी आतापर्यंत अनेक जणांचे जबाब नोंदवले आहेत. अद्याप त्याच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नाही.

पण सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्ये प्रकरणी रोज नवनवीन गोष्टींचा खुलासा होत आहे. आता सुशांत व रियाचे काही व्हाट्सअप चॅट व्हायरल झालेले आहेत. असे म्हटले जाते की हे चॅट रियाच्या वकिलांनी व्हायरल केले आहेत.

या चॅट मध्ये सुरुवातीला सुशांत रियाच्या परिवाराचे कौतुक करताना दिसतो.

सुशांत – तुझा परिवार खूप मस्त आहे. सर खुप मस्त आहेत. शौविकपण खूप दयाळू आहे आणि तु तर माझी आहेस. मला तुझ्या आणि तुझ्या परिवारासोबत राहायला खूप आवडेल. तु प्लीज जराशी हस. तु अशीच खूप छान आहेस. चल मी सुद्धा आता झोपायचा प्रयत्न करतो. टाटा माझी रॉकस्टार.

रिया – हाहाहा झोप ! माय स्वीट बॉय. मी जमिनीवर आल्यावर तुला मेसेज करते कदाचित त्यावेळी तू चंद्रावर असशील.

रिया – हाय माय बेबी कसा आहेस?
सुशांत – मी ठीक नाही आहे.

‘माझी बहीण विक्टिम कार्ड प्ले करून हे संपूर्ण प्रकरण वळवण्याचा प्रयत्न करीत आहे. यासाठी मी स्वतःला शारीरिकरित्या दंड देत आहे. हे खरच खूप निराशाजनक आहे. त्यानंतर रिया म्हणते कि मीटिंग झाल्यावर मला फोन कर.

यानंतरच्या सुशांतच्या मेसेज मध्ये सुशांतने त्याच्या बहिणीबद्दल लिहिले होते.

प्रियांका, तू जे काही करत आहेस ते खुप चुकीचे आहे. दारूच्या नशेत छेड़छाड करून ते लपवण्यासाठी तु विक्टिम कार्ड खेळतेस. आई आणि देव तुला बघत आहेत. जर तुझ्या या घमेंडमुळे तुला काही दिसत नसेल तर माझ्या प्रिय बहिणी तुझे देव भले करो. मी घाबरण्यातला नाही आहे.

दुनियेत बदल आणण्यासाठी मी जे करू इच्छित होतो ते मी पुढेही करत राहीन. कोण बरोबर आहे आणि कोण चुकीचे याचा निर्णय आता देवच घेईल.

सुशांत – त्यांनी तुला माझ्या डोळ्यासमोर मारले. ते माझ्या बहिणीने केले. लोक समजतात की हे तिने दारूच्या नशेत केले आहे. शिवाय तु सुद्धा तिच्या विक्टिम कार्डवाल्या गोष्टी ला मान्य केले आहेस. प्लीज तू मला सांग की ऋषिकेश बस मध्ये आपण जे काही केले त्या गोष्टीची आपल्या दोघांनाही लाज वाटली होती.

गजर मी माझ्या बहिणीच्या नजरेने बघितले तर मी महिलांचा नक्कीच सन्मान करतो कारण असे करायला माझ्या आईने मला शिकवले आहे. मात्र तिने असे सुद्धा त्या वेळी सांगितले होते की नेहमी सत्याची साथ दे. त्यामुळे जे बरोबर आहे त्याला मी घाबरत नाही.

रिया आणि सुशांतची ही चॅट सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. हे मेसेज वाचून अनेकांना धक्का बसत आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.