दिशा-सुशांतचे आत्महत्येच्या आधीचे चॅट सापडले; आतापर्यंतच्या सगळ्या दाव्यांना हादरा देणारी माहिती आली समोर

सुशांत सिंग राजपूतच्या केसमध्ये रोज नवनवीन खुलासा होत आहे. रोज नवीन गोष्टी समोर येत आहेत. आत्ता सुशांत आणि दिशाच्या नात्याची माहीती समोर आली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिशा सुशांतची मॅनेजर नव्हती आणि सुशांतशी तिचे कोणतेही संबंध किंवा मैत्री नव्हती. मुंबई पोलिसांच्या म्हणण्यानुसार दिशा कामाच्या संदर्भात केवळ २३ दिवस सुशांतच्या संपर्कात आली.

दिशा कॉर्नर स्टोन नावाच्या कंपनीत सेलिब्रिटी मॅनेजर म्हणून काम करत होती. कंपनीने दिलेल्या कामासंदर्भात दिशा १ एप्रिल २०२० ते २३ एप्रिल २०२० या कालावधीत सुशांतच्या संपर्कात होती.

दिशा आणि सुशांत दोघांचे फोन रेकॉर्ड तपासले आहेत. ज्यावरून हे दिसून येते की दोघांमध्ये केवळ व्यावसायिक संवाद होता. यानंतर किंवा आधी सुशांत आणि दिशा यांच्यात कोणतेही संभाषण झाले नाही.

सुशांतने दिशासोबत व्हाट्सअपवर चर्चा केली होती. चर्चेत दिशाने सुशांतला स्वयंपाकासाठी वापरण्यात येणाऱ्या एका तेलाच्या ब्रँडच्या प्रमोशनबाबत माहिती दिली.

दिशा सालियन – स्वयंपाकासाठी वापरण्यात येणाऱ्या एका तेलाच्या कंपनीसाठी एक वर्ष ब्रँड अँबेसेडर व्हायचे आहे. १ दिवसाचे शुटिंग असेल आणि अर्ध्या दिवसासाठी टिव्हीसीसाठी रेकॉर्डिंग. एका वर्षात सणाच्या कालावधीत डिजिटल माध्यमात तेलाशी संबंधीत ३ पोस्ट टाकाव्या लागतील.

प्लीज मला सांग.. यासाठी मी त्यांना ६० लाख रुपये सांगू का? याबाबत सल्ला देखील दे।                               सुशांत – ब्रँडचे नावं काय आहे?                                                                                                                                      दिशा – ते आत्ताच त्यांच्या ब्रँडचे नावं जाहीर करणार नाहीत. मला वाटतंय आपण ब्रँड कशाचा आहे. ते पाहून पुढील बोलणी करायला हवीत.                                                                                                                                 सुशांत – ओके…कुल..थँक्यू

१२ एप्रिलला १५ एप्रिल दरम्यान सुशांत आणि दिशामध्ये हॉटस्टारवर प्रसारित होणाऱ्या simpsons शोच्या प्रमोशन बाबत बातचीत झाली. दिशाने डीजनी प्लसचा व्हाट्सअप मेसेज सुशांतला फॉरवर्ड केला. ज्यामध्ये लिहिलं होतं कीं…

simpsonsच्या प्रमोशनसाठी हॉटस्टार सेलिब्रिटी आणि त्यांच्या कुटुंबीयांचे कार्टून बनवण्यात येणार होते. हे कार्टून simpsons च्या पद्धतीने बनवण्यात येणार होते. यामध्ये सेलिब्रिटी आणि त्याच्या कुटुंबियांचे हसताना आणि साधे भाव असणारे कार्टून बनवणार होते.

दिशा – सुशांत डिजनी प्लसवाले Simpsons च्या प्रमोशनसाठी विचारत आहेत. यामध्ये तुम्ही आणि रिया मिळून ते एकत्र करु शकता का? प्लीज तुम्ही मला त्याबाबत सांगा. यासाठी त्यांना किती रुपये सांगू. तुमच्या उत्तराची वाट पाहत आहे.

या प्रश्नावर सुशांतने नको….ही खूष करणारी बाब नाही. असे उत्तर दिले होते. सुशांतने लिहिले होते, की ही बाब त्यांच्यासाठी रोमांचक नाही. त्यामुळे ते करण्यास तयार नाहित. यावरून एक प्रश्नचिन्ह उपस्थित होते आहे की रिया असल्यामुळेच त्याला हे नको होतं का?

अशाप्रकारे, सुशांत आणि दिशा यांच्यामधील संवाद २३ एप्रिलपर्यंत वेगवेगळ्या ब्रँडच्या प्रमोशन, जाहिराती आणि इतर कामांसाठी चालू राहिले. सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात आता दिशा सालियनचा मृत्यू वेगवेगळ्या अँगलने जोडले जात आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.