‘सुर्यवंशम’ चित्रपटातील अभिनेत्रीचा शेवट होता अत्यंत वाईट; गरोदर असताना झाला मृत्यू

अमिताभ बच्चनच्या सुर्यवंशम चित्रपटाला कोणीही विसरु शकत नाही. आत्तापर्यंत टेलिव्हिजनवर सर्वाधिक वेळा हा चित्रपट दाखवण्यात आला आहे. हा चित्रपट आठवल्यानंतर आपल्याला अमिताभ बच्चनसोबत अजून एक चेहरा आठवतो. हा चेहरा आहे अभिनेत्री सौंदर्याचा.

साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील सर्वात यशस्वी अभिनेत्री होत्या सौंदर्या. त्यांनी १२ वर्षांच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट केले होते. त्यासोबतच त्या साऊथच्या प्रत्येक मोठ्या अभिनेत्यासोबत काम करत होत्या. सौंदर्या त्या काळातील सर्वात जास्त फिस घेणाऱ्या अभिनेत्री होत्या.

साऊथच्या सर्वात यशस्वी अभिनेत्री सौंदर्याला अभिनेत्री बनायचे नव्हते. ही गोष्ट खुप कमी लोकांना माहीती आहे. सौंदर्याला अभिनेत्री नाही तर डॉक्टर बनायचे होते. त्यांनी त्याची तयारी देखील सुरु केली होती. पण त्यानंतर त्यांच्या आयूष्याला एक वळण मिळाले.

सौंदर्याचे वडील साऊथ इंडस्ट्रीतील प्रसिद्ध नाव होते. त्यांच्या घरात सिनेमाचे वातावरण होते. पण सौंदर्याला मात्र त्यात रुची नव्हती. त्यांना डॉक्टर बनायचे होते. त्यासाठी त्यांनी खुप मेहनत घेतली आणि मेडिकलला प्रवेश मिळवला.

सौंदर्या मेडिकलचे शिक्षण घेत होत्या त्यावेळी त्यांच्या वडीलांच्या मित्रांनी त्यांना चित्रपटाची ऑफर दिली. सुरुवातीला सौंदर्याने नकार दिला. पण नंतर मात्र त्यांनी मस्करी म्हणून चित्रपटाला होकार दिला. त्यांना त्यात करिअर करायचे नव्हते.

अभिनयात प्रवेश केल्यानंतर सौंदर्या परत गेल्या नाहीत. त्यांच्यावर अभिनयाचा रंग चढला. खुप कमी वेळातच त्या साऊथच्या यशस्वी अभिनेत्री बनल्या. सौंदर्या त्याकाळी एकमेव अशा अभिनेत्री होत्या ज्यांनी तेलगू, तमिळ, कन्नड, मल्ल्याळम आणि हिंदीतील सुपरस्टार्ससोबत काम केले होते.

सौंदर्याने ‘सुर्यवंशम’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये डेब्यू केला होता. हा चित्रपट फ्लॉ झाला. पण सौंदर्या मात्र हिट झाल्या. त्यांना अनेक हिंदी चित्रपटांच्या ऑफर मिळू लागल्या. पण त्या कोणताही चित्रपट करु शकल्या नाहीत. कारण १७ एप्रिल २००४ मध्ये प्लेन क्रॅशमध्ये सौंदर्याचा मृत्यू झाला होता.

सौंदर्याचा मृत्यू झाला. त्यावेळी ती गरोदर होती. तिचा मृत्यू तिच्या चाहत्यांसाठी खुप मोठा धक्का होता. आजही सौंदर्याची आठवण काढली जाते. बॉलीवूडमध्ये तिने सुर्यवंशम हा एकमेव चित्रपट केला. पण याच चित्रपटामूळे तिला बॉलीवूडमध्ये ओळख मिळाली.

महत्वाच्या बातम्या –
आईसाठी काय पण! स्मिता पाटीलचा मुलगा प्रतीक बब्बरने छातीवर गोंदवले आईचे नाव
‘या’ हॉलीवूड अभिनेत्याने केले होते शिल्पा शेट्टीला सगळ्यांसमोर जबरदस्ती किस; प्रकरण गेले कोर्टात
करिअरमध्ये अक्षय,अजयपेक्षा मागे का राहिले सुनील शेट्टी; स्वतःच सांगितले ‘ते’ कारण
‘दिल दोस्ती दुनियादारी’ मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्रीचा विवाह झाला संपन्न; नवरा आहे प्रसिद्ध अभिनेता

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.