भारतीय संघात निवड होताच सूर्यकुमारने ठोकलं धमाकेदार अर्धशतक, निवडीवर प्रश्नचिन्ह लावणाऱ्यांना उत्तर

मुंबई | इंग्लंडचा क्रिकेट संघ भारत दौऱ्यावर आहे. दोन्ही संघात सध्या कसोटी मालिका सुरू आहे. यानंतर पाच टी-२० सामन्यांची मालिका भारत आणि इंग्लंड यांच्यात रंगणार आहे. यासाठी धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादवची प्रथमच भारतीय संघात निवड करण्यात आली आहे.

भारतीय संघात पदार्पण करणाऱ्या सूर्यकुमार यादवने आपला आनंद अनोख्या पद्धतीने साजरा केला आहे. सूर्यकुमारने सध्या तो खेळत असलेल्या विजय हजारे ट्रॉफिमध्ये त्याने दमदार अर्धशतक झळकवले आहे.

जयपुरिया महाविद्यालयाच्या मैदानावर खेळवल्या गेलेल्या दिल्ली विरुद्ध मुंबई या सामन्यात मुंबईकडून खेळताना सूर्यकुमारने ३३ चेंडूत ५० धावांची जबरदस्त खेळी केली आहे. या सामन्यात मुंबईने ७ गडी राखून विजय मिळवला आहे.

दरम्यान, आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे सूर्यकुमारला ही संधी मिळाली आहे. यापुर्वी सूर्यकुमार यादवची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड करण्यात आली नव्हती. त्यामुळे निवड समितीवर बरीच टीका करण्यात आली होती. परंतु आता इंग्लंड विरुद्धच्या टी-२० सामन्यांच्या मलिकेसाठी झालेल्या निवडीनंतर तो भावूक झाल्याचे पाहायला मिळते आहे. त्याने सोशल मीडियावर फोटो पोस्ट केला आहे.

भारतीय संघात निवड होण्यासाठी सूर्यकुमार यादवला बरीच मोठी प्रतिक्षा करावी लागली आहे. सूर्यकुमारने प्रथम श्रेणी ७७ समान्यात ४४.०१ च्या सरासरीने ५ हजार ३२६ धावा केल्या आहेत. यात त्याने १४ शतक आणि २६ अर्धशतक झळकवले आहेत. तसेच १७० टी-२० सामन्यात १४०.१० च्या स्ट्राइक रेटने ३ हजार ५६७ धावा चोपल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-
सूर्यकुमार यादव हा भारताचा एबी डिव्हिलियर्स – हरभजनसिंग
भारतीय संघात निवड झाल्यानंतर सूर्यकुमारला भावना अनावर; म्हणाला, विश्वास बसत नाहिये पण…
भारतीय संघात निवड न झाल्यामुळे संतापलेल्या सुर्यकुमारने रोहीतसमोर केले मन मोकळे, म्हणाला…
छत्रपती शिवाजी महाराजांकडून प्रेरणा घेतलेल्या सयाजी शिंदे यांनी आईला दिली ‘ही’ अनोखी भेट
खुशखबर! ‘या’ बँकेची धमाकेदार बचत योजना; फक्त ५ रुपयांमध्ये उघडा खातं आणि मिळवा १ लाख

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.