Suryakumar Yadav : BCCI ची सर्वात लोकप्रिय स्पर्धा रणजी ट्रॉफी डिसेंबर 2022 मध्ये सुरू होण्याची घोषणा करण्यात आली. पहिला सामना 13 डिसेंबरपासून होणार आहे. या स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ मुंबईसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा स्टार फलंदाज आगामी मोसमात 41 वेळच्या चॅम्पियन संघासाठी फलंदाजी करताना दिसणार आहे.
वृत्तानुसार, सूर्यकुमार यादव दुसऱ्या ग्रुप स्टेज मॅचपासून मुंबईसाठी उपलब्ध असेल. टीम इंडियाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव आगामी रणजी ट्रॉफीसाठी दुसऱ्या गट टप्प्यातील सामन्यात निवडीसाठी उपलब्ध असेल. वृत्तानुसार, नियमितपणे भारतीय संघाशी संबंधित असलेला सूर्यकुमार यादव संघातून विश्रांती घेतल्यानंतर रणजी ट्रॉफी खेळण्यासाठी उपलब्ध असेल.
या स्पर्धेतील मुंबईचा दुसरा सामना 13 डिसेंबर रोजी आंध्र प्रदेश विरुद्ध आहे. “सूर्यकुमार यादव गेल्या 75 दिवसांपासून भारतासाठी पांढऱ्या चेंडूचे क्रिकेट खेळत आहेत. आता काही दिवस तो त्याच्या घरी परतला आहे आणि खूप थकला आहे. तो एक छोटा ब्रेकही घेणार आहे. तो मुंबईच्या पहिल्या रणजी ट्रॉफी सामन्याला मुकणार आहे परंतु 20 डिसेंबर रोजी हैदराबादविरुद्ध खेळण्यासाठी तो उपस्थित राहणार आहे.
सूर्यकुमार यादव गेल्या अनेक महिन्यांपासून टीम इंडियासाठी सतत खेळताना दिसत आहे. २०२२ च्या टी२० विश्वचषकापूर्वीही तो संघाचा भाग होता. मुंबईच्या या धडाकेबाज फलंदाजाने या वर्षात भारतासाठी एकूण 44 सामने खेळला आहे. अशा स्थितीत त्याला बांगलादेश दौऱ्यावर विश्रांती देण्यात आली आहे.
मागील वर्षीही मुंबईने रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचली होती. अंतिम सामन्यात संघाला मध्य प्रदेशकडून पराभवाचा सामना करावा लागला. याशिवाय सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेत मुंबई संघाने इतिहासात प्रथमच विजेतेपद पटकावले. विजय हजारे करंडक स्पर्धेत संघाने चांगली कामगिरी केली होती, मात्र उत्तर प्रदेशकडून झालेल्या पराभवामुळे ते उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यातून बाहेर पडले होते.
टीम इंडियासाठी मिस्टर 360 म्हटल्या जाणार्या सूर्यकुमार यादवसाठी 2022 हे वर्ष खूप चांगले आहे, टीमसाठी सतत टी-20 क्रिकेट खेळणाऱ्या सूर्याने फार कमी कारकिर्दीत ICC क्रमवारीत पहिले स्थान मिळवले आहे. 2022 मध्ये सूर्याने टी-20 फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत. 2022 मध्ये 31 आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यांमध्ये 1164 धावा केल्या. यादरम्यान सूर्यकुमार यादवची सरासरी ४६.५६ आहे, तर स्ट्राइक रेट १८७.४३ आहे. याशिवाय त्याने यावर्षी 2 शतकांव्यतिरिक्त 9 वेळा पन्नास धावांचा आकडा पार केला आहे.
सूर्यकुमार यादवने माऊंट मौनगानुई येथे न्यूझीलंडविरुद्ध 51 चेंडूत 111 धावा केल्या. यादरम्यान त्याने 11 चौकार आणि 7 षटकार मारले. यासह न्यूझीलंडमध्ये शतक झळकावणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला. याशिवाय 2022 मध्ये त्याने 7 वेळा सामनावीराचा किताब पटकावला. या प्रकरणात सूर्यकुमार यादवने विराट कोहलीला मागे टाकले.
महत्वाच्या बातम्या
Suryakumar Yadav : बांगलादेश दौऱ्यावर निवड न झाल्याने सूर्यकुमार यादव निराश; टीम इंडियाला सोडून ‘या’ संघातून खेळणार
KL Rahul : ‘मी बॅटने धावा केल्या तर फिल्डींगने सामना हरवेल’; पराभवानंतर भडकलेल्या चाहत्यांनी उडवली राहूलची खिल्ली
Rohit Sharma : ‘आम्हाला याची सवय झालीय…’, बांगलादेश विरूद्धच्या पराभवावर रोहित शर्माचे हैराण करणारे वक्तव्य






