मुंबई | बीसीसीआयने शनिवारी इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. यामध्ये मुंबई इंडियन्सचा धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादवची प्रथमच निवड भारतीय संघात झाली आहे. भारतीय संघात निवड होणे हे स्वप्नवत असल्याचे सूर्यकुमारने म्हटले आहे.
आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे सूर्यकुमारला ही संधी मिळाली आहे. यापुर्वी सूर्यकुमार यादवची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड करण्यात आली नव्हती. त्यामुळे निवड समितीवर बरीच टीका करण्यात आली होती. परंतु आता इंग्लंड विरुद्धच्या टी-२० सामन्यांच्या मलिकेसाठी झालेल्या निवडीनंतर तो भावूक झाल्याचे पाहायला मिळते आहे. त्याने सोशल मीडियावर फोटो पोस्ट केला आहे.
भारतीय संघात निवड होण्यासाठी सूर्यकुमार यादवला बरीच मोठी प्रतिक्षा करावी लागली आहे. सूर्यकुमारने प्रथम श्रेणी ७७ समान्यात ४४.०१ च्या सरासरीने ५ हजार ३२६ धावा केल्या आहेत. यात त्याने १४ शतक आणि २६ अर्धशतक झळकवले आहेत. तसेच १७० टी-२० सामन्यात १४०.१० च्या स्ट्राइक रेटने ३ हजार ५६७ धावा चोपल्या आहेत.
सूर्यकुमारची निवड झाल्यानंतर त्याने डीवाय पाटील स्टेडियमच्या खेळपट्टीवर बसलेला एक फोटो शेअर केला आहे. या फोटोला त्याने The Feelings Is Surreal असे कॅप्शन दिले आहे. तसेच सूर्यकुमारच्या निवडीवर हरभजन सिंगने ट्विट केले आहे. तो म्हणतो “अखेर सूर्यकुमार यादवला टीम इंडियामध्ये स्थान मिळालं. खुप शेभुच्छा”
So good to finally @surya_14kumar in Team India 👏👏 Good luck
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) February 20, 2021
महत्त्वाच्या बातम्या-
नरेंद्र मोदींनी आकाशातून टिपला भारत इंग्लंड सामन्याचा क्षण, पाहा फोटो
IND Vs ENG : विराटलाही त्याने केलेल्या ‘त्या’ नव्या विक्रमावर विश्वास बसला नाही; पहा व्हिडीओ
काय सांगता! सरकारचे इलेक्ट्रिक दुचाकी खरेदीवर ३० हजार तर चारचाकी खरेदीवर १ लाख ५० हजारांचे अनुदान
मधूबाला, कमाल अमरोही आणि मीना कुमारीचा लव्ह ट्रॅंगल ऐकून तुम्हाला धक्का बसेल