इंडियाचा उपकर्णधार होताच सूर्याचा कहर; गोलंदाजांना धू धू धूतले, फक्त ४० चेंडूत ठोकल्या ९५ धावा

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू सूर्यकुमार यादवने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धुमाकूळ घातला आहे. आता त्याने रणजी ट्रॉफीमध्ये खेळतानाही आपल्या प्रसिद्ध शैलीत फलंदाजी करत सौराष्ट्राच्या गोलंदाजांना धू धू धूतले आहे. खरं तर, मुंबईकडून खेळताना सूर्याने रणजी ट्रॉफी 2022-23 हंगामात आपल्या धडाकेबाज खेळीने पुन्हा एकदा सर्वांची मने जिंकली आहेत.

पहिल्या सामन्याच्या पहिल्या डावात तो ९१ धावांवर बाद झाला. त्याचप्रमाणे दुसऱ्या सामन्यातही त्याने कहर केला आहे. नुकत्याच झालेल्या बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत सूर्यकुमार यादवला संधी देण्यात आली नाही. त्यानंतर तो रणजी ट्रॉफीकडे वळला.

3 डिसेंबर रोजी, त्याने मुंबईसाठी पहिला सामना खेळला, ज्याच्या पहिल्या डावात त्याने 90 धावांची धडाकेबाज खेळी खेळली. आणि पुन्हा एकदा सौराष्ट्रविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात त्याने 95 धावांची आकर्षक खेळी केली. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 14 चौकार आणि 1 षटकारही दिसला, तरीही सूर्याला लागोपाठ 2 सामन्यात शतक हुकल्याचे वाईट वाटत असेल.

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर सौराष्ट्राने पहिल्या डावात केलेल्या 289 धावांना प्रत्युत्तर देताना वृत्त लिहेपर्यंत मुंबईने 4 गडी गमावून 159 धावा केल्या आहेत. यासोबतच, भारतीय क्रिकेट बोर्डाने मंगळवारी श्रीलंकेविरुद्धच्या आगामी एकदिवसीय आणि टी-20 मालिकेसाठी संघाची घोषणा केली आहे.

टी-20 संघात मोठा बदल करताना बीसीसीआयने हार्दिक पांड्याकडे कर्णधारपद सोपवले आहे, तर या मालिकेसाठी सूर्यकुमार यादवची उपकर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यासोबतच रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल आणि ऋषभ पंत यांना टी-२० मधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडियामध्ये हार्दिक पंड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), इशान, ऋतुराज, शुभमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, उमरान मलिक, शिवम मावी. , मुकेश युवक हे खेळाडू आहे.

सूर्यकुमार यादव या वर्षी सर्वाधिक टी-२० आंतरराष्ट्रीय धावा करणारा फलंदाज होता. आगामी श्रीलंका मालिकेत (IND vs SL T20I मालिका) त्याचे फळही त्याला मिळाले. T20 संघात, त्याला बढती देऊन उपकर्णधार (टीम इंडियाचा उपकर्णधार) बनवण्यात आले. जेव्हा सूर्यकुमार यादवला उपकर्णधार झाल्यानंतर कसे वाटले असे विचारण्यात आले तेव्हा त्याने सांगितले की हे त्याच्यासाठी स्वप्नासारखे आहे. सूर्याने सांगितले की, आपल्याला असे घडण्याची अपेक्षा नव्हती.

बुधवारी रणजी ट्रॉफीमध्ये सौराष्ट्रविरुद्ध ९५ धावांची इनिंग खेळल्यानंतर सूर्या म्हणाला, ‘मला याची (उपकर्णधार होण्याची) अपेक्षा नव्हती. पण गेले वर्ष ज्या प्रकारे गेलं, ते माझ्यासाठी एक बक्षीस आहे असं मला वाटतं. मला हे मिळाल्यामुळे बरे वाटते.

ही बातमी वडिलांनी दिल्याचे सूर्यकुमारने सांगितले. सूर्या म्हणाला, ‘माझ्या वडिलांनी मला खेळाडूंची यादी पाठवली कारण ते नेहमीच सोशल मीडियावर असतात. त्यानंतर आम्ही एकमेकांशी बोललो. त्यांनी मला आणखी एक छोटा संदेश पाठवला. त्यात लिहिले की जास्त दडपण घेऊ नको आणि तुझ्या फलंदाजीचा आनंद घे.

सूर्यकुमार म्हणाला, ‘मी डोळे बंद करून विचारले, ही टीम आहे का? ते माझ्यासाठी स्वप्नासारखे होते. हे माझ्या वर्षभराच्या मेहनतीचे फळ आहे. मी पेरलेले झाड अखेर मोठे झाले आणि आता मी त्याची फळे चाखत आहे. ज्या प्रकारे घडामोडी घडत आहेत त्यामुळे मी खूप आनंदी आहे.

32 वर्षीय सूर्यकुमार यादवने गेल्या वर्षीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याच्या छोट्या कारकिर्दीत तो T20 आंतरराष्ट्रीय क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. सूर्याने आतापर्यंत 42 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 44 च्या सरासरीने आणि 180+ च्या स्ट्राइक रेटने 1408 धावा केल्या आहेत. त्याने 16 एकदिवसीय सामनेही खेळले आहेत. त्याला अद्याप कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळालेली नाही.

महत्वाच्या बातम्या
Ved : रितेश-जेनेलियाच्या ‘वेड’ने लोकांना लावलं वेड, पहिल्याच दिवशी जमवला ‘इतक्या’ कोटींचा गल्ला
ऋषभ पंतला मृत्यूपासून वाचवणाऱ्या ड्रायव्हर-कंडक्टरला मिळाले हे बक्षीस, त्यांनी सांगितली संपूर्ण घटना
लालसिंग चड्ढाच्या धक्क्यामुळे आमिरने बदलला मार्ग, आता केले असे काही की कुणी विचारही केला नव्हता