इंग्लंडवरील दणदणीत विजयानंतर पदार्पण करणाऱ्या सुर्यकुमारने दिली ‘ही’ प्रतिक्रिया, म्हणाला….

अहमदाबाद | भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात पाच टी-२० सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताकडून दोन युवा खेळाडूंनी पदार्पण केले. सामन्यात आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या युवा फलंदाज इशान किशन आणि सुर्यकुमार यादव यांना संधी देण्यात आली आहे.

सुर्यकुमार आणि इशान या दोघांचेही हे आतंरराष्ट्रीय पदार्पण आहे. सामना संपल्यानंतर सूर्यकुमार यादवने एक ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

इंग्लंड विरुद्धच्या या दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताने दणदणीत विजय मिळवला आहे. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना १६५ धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान भारताने फक्त ३ विकेट्सच्या मोबदल्यात १७.५ षटकात पूर्ण केले.

दरम्यान, सुर्यकुमारला त्याच्या या पदार्पणाच्या सामन्यात बॅट घेऊन मैदानावर येण्याची संधी मिळाली नाही. भारताने त्यापुर्वीच सामना आपल्या खिशात घातला होता. परंतु या सामन्यानंतर सुर्यकुमारने एक ट्विट केले आहे.

ट्विटमध्ये सुर्यकुमारने त्याचे सामन्यातील काही फोटो शेअर केले आहेत. यासोबत कॅप्शनमध्ये त्याने त्याच्या इथपर्यंतच्या यशाचे श्रेय त्याच्या आई, वडील, बहीण, बायको, कोच आणि शुभचिंतक मित्रमंडळींना दिले आहे. तो म्हणतो, आपण हे स्वप्न सोबत पाहीलं, त्यासाठी सोबत वाट पाहिली आणि ते आपण सोबत पूर्ण केलं आहे.

दरम्यान, भारतीय संघात निवड होण्यासाठी सूर्यकुमार यादवला बरीच मोठी प्रतिक्षा करावी लागली आहे. सूर्यकुमारने प्रथम श्रेणी ७७ समान्यात ४४.०१ च्या सरासरीने ५ हजार ३२६ धावा केल्या आहेत. यात त्याने १४ शतक आणि २६ अर्धशतक झळकवले आहेत. तसेच १७० टी-२० सामन्यात १४०.१० च्या स्ट्राइक रेटने ३ हजार ५६७ धावा चोपल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या-
इशान किशनने पदार्पणातच इंग्लीश बॉलर्सच्या उडवल्या चिंधड्या; ३२ चेंडूत ५६ धावांची तुफानी खेळी
भारताने वचपा काढला, इंग्लंडचा दारूण पराभव; इशान, विराटची धुंवादार खेळी
इशान किशनची गर्लफ्रेंड आहे मॉडेल, हॉट फोटोंचा सोशल मिडीयावर धुराळा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.