चाहत्यांनी विराट, रोहित आणि धोनीचं एका शब्दात वर्णन करायला सांगितलं; सुर्यकुमारने दिली भन्नाट उत्तरं

भारतीय संघातील काही खेळाडूंनी जगभरात आपली एक वेगळ ओळख निर्माण केली आहे. त्यामध्ये विचार केला तर सर्वात आधी विराट कोहली, रोहित शर्मा आणि निवृत्ती घेतलेल्या महेंद्र सिंग धोनीचे नाव समोर येते.

सोशल मीडियावर या तिन्ही खेळाडूंविषयी नेहमीच चर्चा केली जाते. तसेच कोणता खेळाडू महान आहे यावरही चाहत्यांचे वादविवाद होत असतात. आता भारतीय संघाचा खेळाडू सुर्यकुमार याने या तिन्ही खेळाडूंबद्दल एक मोठे वक्तव्य केले आहे. त्याच्या या वक्तव्याने अनेकांची मने जिंकून घेतली आहे.

सध्या आयपीएल स्थगित झाल्याने भारतीय संघातील खेळाडूंना रिकामा वेळ मिळाला आहे. त्यामुळे ते सोशल मीडियावर खुप ऍक्टिव्ह असल्याचे दिसून येत आहे. अशातच सुर्यकुमार यादवने एक लाईव्ह सेशन घेतले होते. त्यामध्ये चाहत्यांनी अनेक मजेदार प्रश्न सुर्यकुमारला विचारले आहे.

तेव्हा चाहत्यांनी क्रिकेटपटूंचे एका शब्दात वर्णन कसे करायला सांगितले. प्रश्न अवघड होता. पण सुर्यकुमार डगमगला नाही. सचिन तेंडूलकरचे एका शब्दात वर्णन करायचे होते, तेव्हा त्याने पटकन क्रिकेटचा देव असे म्हणून उत्तर दिले.

दुसऱ्या एका चाहत्याने लगेच विराट कोहलीबद्दल विचारले, तर त्याने प्रेरणादायक असे उत्तर दिले. लगेच एका धोनीच्या चाहत्याने हाच प्रश्न विचारला की धोनीचे एका शब्दात वर्णन तर सुर्यकुमार म्हणाला लिजेंड्री.

त्यानंतर भारतीय संघाचा खेळाडू रोहित शर्मा याच्याबद्दलही चाहत्यांनी विचारले. विशेष म्हणजे सुर्यकुमार आणि रोहित शर्मा दोन्ही आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडूनच खेळतात, तर चाहत्यांना उत्सुकता होतीस की तो काय बोलेल. त्यावेळी त्याने हिटमॅन असे उत्तर दिले.

महत्वाच्या बातम्या-

मलायकाचं वय, घटस्फोट आणि मुलाबाबत व्यक्त झाला अर्जुन कपूर, नात्याबद्दल खुलासा करताना म्हणाला…
VIDEO: सनी लिओनीचा गाऊन इतका फिट झाला की, चैन लावणे झाले होते अवघड मग पहा पुढे काय झाले….
अग्गंबाई सुनबाईमध्ये कलाकाराने शिलाई मशीनला मारली लाथ; शिंपी समाज झाला आक्रमक

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.