मुंबई | इंग्लंडचा क्रिकेट संघ भारत दौऱ्यावर आहे. दोन्ही संघात सध्या कसोटी मालिका सुरू आहे. यानंतर पाच टी-२० सामन्यांची मालिका भारत आणि इंग्लंड यांच्यात रंगणार आहे. यासाठी धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादवची प्रथमच भारतीय संघात निवड करण्यात आली आहे.
बीसीसीआयच्या निवड समितीने टी-२० विश्वचषक स्पर्धेपुर्वी सूर्यकुमारला संधी दिली आहे. त्यामुळे बीसीसीआय विश्वचषक स्पर्धेसाठी मजबूत संघ बनवण्याकडे लक्ष देत असल्याचे स्पष्ट झाले आहे. इंग्लडविरुद्धच्या निवडीनंतर सूर्यकुमारला त्याची धडाकेबाज कामगिरी भारतीय संघासाठी करावी लागणार आहे. यामुळे त्याचा विश्वचषकात खेळण्याचा मार्ग मोकळा होईल.
दरम्यान, भारतीय संघात संधी मिळाल्यानंतर सूर्यकुमार यादवची प्रतिक्रिया समोर आली आहे. तो म्हणाला, मला वाटत माझ्यासाठी मुंबई इंडियन्सचा पाठिंबा खूप महत्त्वाचा होता. मला अजून आठवतंय २०१८ मध्ये मी जेव्हा केकेआर मधून मुंबई इंडियन्समध्ये परत आलो होतो. मला खालच्या क्रमांकावर फलंदाजी करावी लागत होती. मला फिनिशरची भूमिका तेव्हा पार पाडावी लागत होती.
पुढे बोलताना सूर्यकुमार म्हणाला, मुंबई इंडियन्समध्ये योजना स्पष्ट झाली होती. त्यांच्यासाठी मी एक टॉप ऑर्डर फलंदाज होतो. त्यांनी मला ती जबाबदारी दिली. मला मुंबई इंडियन्सने आव्हान दिले होते की मी मैदानात जाव आणि बेधडक खेळावं. मी तेच केल आहे. यावेळी माझ्या खेळाच मुंबई इंडियन्सने भरपूर समर्थन केले.
सूर्यकुमारने निवडीचे श्रेय दिले रोहित शर्माला-
मुंबई इंडियन्सचा कर्णधार असलेल्या रोहित शर्माने आणि मुंबई इंडिन्सने माझ्या क्षमतेवर विश्वास दाखवला आहे. ते माझ्यासाठी खूप सकारात्मक आहेत. गेल्या तीन वर्षांपासून मी खेळाचा आनंद घेत आहे. कर्णधार रोहित शर्माने माझ्यावर खूप विश्वास दाखवला आहे.
रोहितच्या या विश्वासामुळेच आज माझ्यासाठी भारतीय संघाचे दरवाजे खुले झाले आहेत. असे मत सूर्यकुमार यादवने व्यक्त केले आहे. त्याने भारतीय संघात निवड झाल्याचे श्रेय रोहित शर्मासह मुंबई इंडियन्सला दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
भारतीय संघात निवड झाल्यानंतर सूर्यकुमारला भावना अनावर; म्हणाला, विश्वास बसत नाहिये पण…
भारतीय संघात निवड न झाल्यामुळे संतापलेल्या सुर्यकुमारने रोहीतसमोर केले मन मोकळे, म्हणाला…
सूर्यकुमारचे बॅटमधून चोख उत्तर, भारतीय संघात निवड होताच ठोकलं धमाकेदार अर्धशतक