रोहितसाठी आउट होणाऱ्या सुर्यकुमारने सांगितले आउट होण्याचे खरे कारण, म्हणाला…

मुंबई । यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबईने बाजी मारली. यामुळे टीमचे कौतुक केले जात आहे. या स्पर्धेत मुंबईचा खेळाडू सुर्यकुमार हा हिरो ठरला. अनेकांची मने त्याने जिंकली.

कधी विराटमुळे, कधी त्याच्या खेळीमुळे आणि कधी मैदानावरील त्याच्या अनोख्या अंदाजामुळे सातत्याने सर्वांचे लक्ष वेधताना तो दिसला. अगदी अंतिम सामन्यातही त्याने असे काही केले, की नेटकऱ्यांनी त्याला कडक सॅल्युटच केला. त्याच्या या अंदाजामुळे कर्णधार रोहित शर्माने देखील त्याचे भरभरून कौतुक केले.

आयपीएलच्या अंतिम सामना हा दिल्ली आणि मुंबई संघांमध्ये खेळला गेला. दिल्लीने मुंबईपुढे १५७ धावांचे लक्ष्य ठेवले होते. धावसंख्येचा पाठलाग करताना मैदानात असा एक प्रसंग घडला जो पाहून क्रीडारसिकांसोबतच नेटकऱ्यांनीही सूर्यकुमार यादव या खेळाडूला सलामच केला.

सामन्यात रोहितने एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने एक फटका मारला. धाव घेण्यासाठी म्हणून रोहित पुढे आला. सूर्यकुमार यावेळी नॉनस्ट्राईक एंडला होता. त्याची नजर चेंडूवरच होती. ही धाव न घेण्यालाठी म्हणून त्याने रोहितला इशाराही केला. पण रोहित तोपर्यंत पुढे आला होता.

आपण आउट होणार हे माहित असताना देखील मुद्दाम केवळ रोहित आउट होऊ नये म्हणून सूर्यकुमारने क्रिज सोडत तो दुसऱ्या एंडच्या दिशेने पुढे आला. यष्टीरक्षक ऋषभ पंतने स्टंपला चेंडू मारला. आणि सुर्यकुमारला बाद घोषित करण्यात आले. यामुळे त्याचा मनाचा मोठीपणा पुन्हा एकदा दिसला. यावर तो म्हणाला, रोहित उत्तम खेळाडू आहे, त्याच्यासाठी विकेट देणे मोठी गोष्ट नाही.

यामुळे रोहित देखील नाराज झाला. पण केवळ तो आउट होऊ नये म्हणून सुर्यकुमारने हा खटाटोप केला. या प्रकारामुळे सोशल मीडियावर सुर्यकुमारचे कौतुक केले जात आहे. यामुळे अंतिम सामन्यात तो देखील होरो ठरला.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.