जयभीम वादाच्या भोवऱ्यात; ‘या’ कारणामुळे लोकांनी अभिनेत्याला दिल्या जीवे मारण्याच्या धमक्या

दक्षिण भारतीय चित्रपटांचा प्रसिद्ध अभिनेता, सूर्या सध्या त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या कोर्टरूम ड्रामा चित्रपट ‘जय भीम’मुळे चर्चेत आला आहे. सुर्याचा हा चित्रपटा चांगलाच हिट ठरला असून प्रेक्षकांकडून खुप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यानंतर ज्या महिलेच्या आयुष्यावर ही कथा आहे, तिला सुर्याने १० लाखांची मदत केली आहे.

ज्यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारित आहे, त्या पार्वथिया अम्मलला सुर्याने १५ लाख रुपये दिले आहेत. त्यामध्ये प्रोडक्शन टीमने ५ लाख दिले आहे, तर सुर्याने मदत केलेली रक्कम १० लाख रुपये आहे. पार्वथिया अम्मल यांनी मंगळवारी संध्याकाळी सूर्याची त्यांच्या राहत्या घरी भेट घेतली होती.

पार्वथियासोबत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेतेही होते. त्यांच्यासोबत राज्य सचिव के बालकृष्णन आणि पक्षाचे सदस्य गोविंदन होते, जे पहिल्यापासून पार्वथिया अम्मलच्या न्यायाच्या लढ्यात त्यांच्या पाठीशी उभे होते. पार्वथिया अम्मलच्या नावावर केलेल्या १५ लाख रुपयांच्या देणगीपैकी, सुर्याने १० लाख रुपयांचे योगदान दिले आहे, तर त्याची निर्मिती फर्म 2D एंटरटेनमेंटने ५ लाख रुपयांचे योगदान दिले आहे.

दरम्यान, एका मुद्यावरुन हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या चित्रपटात जातीच्या आधारावर होणारा भेदभाव दाखवण्यात आल्याचे बोलले जात आहे. अशा परिस्थितीत आता वन्नियार समाजाने या चित्रपटाला सातत्याने विरोध सुरू केला आहे. त्यामुळे आता तामिळनाडू सरकारने सूर्याला पोलिस संरक्षण दिले आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सूर्याच्या घरावर पोलिसांची सुरक्षाही वाढवण्यात आली आहे. वृत्तानुसार, वन्नियारच्या प्रदेशाध्यक्षांनी ‘जय भीम’चा मुख्य अभिनेता सुर्या, अभिनेत्री ज्योतिका, दिग्दर्शक टीजे ज्ञानवेल आणि अॅमेझॉन प्राइम व्हिडिओलाही कायदेशीर नोटीस बजावली आहे. या नोटीसमध्ये वन्नियार यांनी चित्रपटाच्या संपूर्ण टीमला त्यांच्या समुदायाची माफी मागायला सांगितले आहे.

इतकेच नाहीतर अभिनेता सुर्याला वेगवेगळ्या प्रकारे धमक्याही देण्यात आल्या आहेत. या सूचनेनंतरच सूर्याच्या घरावर पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. अभिनेत्याच्या निवासस्थानी ५ सशस्त्र पोलिसांचा एक गट तैनात करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या-
१० हजारात सुरु केली कंपनी, नीट इंग्रजीही येत नव्हती; वाचा पेटीएमच्या विजय शेखरांची संघर्षगाथा
देशवासीयांची माफी मागून तीनही शेतकरी कायदे रद्द करतो – मोदी; शेतकऱ्यांना केले ‘हे’ आवाहन
‘मी माझा पगार संजय राऊत यांना देतो, त्यांनी त्यांचे घर चालवून दाखवावे’

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.