त्याने माझे क्लिवेज आणि मांड्यांना…; सुरवीन चावलाने सांगितला बॉलिवूडचा धक्कादायक अनुभव

बॉलिवूडच्या ग्लॅमसर दुनियेत कास्टिंग काऊच हा प्रकार काही नवा नाही. चित्रपटात काम देण्यासाठी अनेक चित्रपट निर्माते, कास्टिंग डायरेक्टर, डायरेक्टर अभिनेत्रींकडून वेगवेगळ्या मागण्या करत असतात. आता पर्यंत अनेक अभिनेत्रींनी कास्टिंग काऊचबद्दल खुलासे केले आहे.

आता असाच एक धक्कादायक अनुभव अभिनेत्री सुरवीन चावलाने शेअर केला आहे. सेक्रेड गेममुळे मनोरंजन विश्वात आपली एक वेगळी ओळख बनवणाऱ्या सुरवीनने आपल्याला तीन वेळा कास्टिंग काऊचचा सामना करावा लागला असल्याचे म्हटले आहे.

२०१९ मध्ये दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सुरवीनने म्हटले होते, की मला तीनवेळा कास्टिंग काऊचचा सामना करावा लागला होता. एकदा मला एका फिल्ममेकरसोबत जाण्यासाठी सांगितले होते.

एका दिग्दर्शकाने मला म्हटले होते, की मला तुझ्या शरीराचे अंग किती इंचाचे आहे, हे बघायचे आहे. तेव्हापासून मी अशा लोकांकडे दुर्लक्ष करण्यास सुरुवात केली, असे सुरवीन एखा मुलाखतीमध्ये म्हटले होते.

साऊथ इंडस्ट्रीमध्येही माझे सोबत असेच काही झाले होते.एक राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक होता. त्याने माझे खुप मोठे ऑडिशन घेतले होते. तेव्हा मी खुप आजारी पडली होती. पण त्या दिग्दर्शकाने अचानक मला मुंबईला बोलावले. हा अनुभव माझ्यासाठी खुप भितीदायक होता, त्यामुळे त्याला नकार दिला, असेही सुरवीनने म्हटले आहे.

त्या दिग्दर्शकाला हिंदी येत नव्हती. त्याला फक्त तामिळ आणि इंग्लिशच बोलता येत होते. त्यामुळे त्याने एका दुसऱ्या व्यक्तीला माझ्याशी बोलायला लावले. तो व्यक्ती म्हणाला, सरांना तुम्हाला जवळून जाणून घ्यायचे आहे. तेव्हा मी म्हणाली, काय?, तर तो म्हणाला हे सर्व फक्त चित्रपट संपेपर्यंत चालेल.

त्याला मी म्हणाली, तुम्ही चुकीच्या दरवाज्यावर आले आहात. दिग्दर्शकांना जर वाटत असेल की मी चांगले काम करणार नाही, तर मी त्यांच्या चित्रपटात काम करणार नाही. पण मी स्वत:ला बदलू शकत नाही, असे सुरवीनने म्हटले आहे.

तसेच बॉलिवूडचा अनुभव सांगत म्हणाली, एक चित्रपटाचा निर्मात्याला मला बघायचे होते. त्याला बघायचे होते, की माझे क्लिवेज कशी दिसते. त्याला माझी मांडी बघायचे होती आणि या सर्व गोष्ट आजही इंडस्ट्रीमध्ये होतात, असे सुरवीनने म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-

काय सांगता! ATM मध्ये १४०० रुपये काढायला गेलेल्या महिलेला लागली कोट्यावधीची लॉट्री, जाणून घ्या….
लग्नानंतर सासरी जाणाऱ्या नवरीला नवरदेवाच्या भावाने रस्त्यातच केली मारहाण; धक्कादायक कारण आले समोर
Indian Idol 12; ट्रोल होत असलेल्या शण्मुखप्रिया बद्दल जावेद अख्तर यांनी केले धक्कदायक विधान, म्हणाले…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.