डब्बू अंकलला दिली साताऱ्यातील सुर्वे काकांनी टक्कर, सोशल मिडियावर व्हिडिओ घालतोय धुमाकूळ

सातारा | आजकाल सोशल मिडियावर अनेक फोटो, व्हिडिओ पाहायला मिळतात.  सोशल मिडियावर फोटो, व्हिडिओ शेअर करत अनेकजण प्रसिद्धी मिळवतात. असाच एक ७८ वर्षीय सुर्वे काकांचा व्हिडिओ सोशल मिडियावर धुमाकूळ घालत आहे.

सातारा जिल्ह्यातील वाई येथील चित्रा टॉकीजचे मालक कैलास सुर्वे यांनी मुलीच्या लग्नात स्टेजवर जावून तुफान डान्स केला आहे. बीग बी अमिताभ बच्चन यांच्या ‘खायके पान बनारसवाला’ गाण्यावर डान्स करत त्यांनी उपस्थितांचे मन जिंकलं आहे.

सुर्वे यांचा हा डान्स पाहून उपस्थितांनी मोबाईलमध्ये त्याचे चित्रीकरण केले. त्यांचा डान्स संपुर्ण महाराष्ट्रात व्हायरल झाला आहे. वयाच्या ७८ व्या वर्षी केलेला हा डान्स तरूणांनाही करता येणार नाही असा डान्स त्यांनी केला आहे. अमिताभ बच्चन ज्या पद्धतीने स्टेप करतात तसाच सुर्वे काकांनी डान्स केला आहे.

 

यावेळी त्यांनी एका जवळच्या मित्राची आठवण सांगितली की, वीस वर्षांपुर्वी मी परिसरातील गणेश उत्सवाच्या कार्यक्रमात असाच डान्स केला होता. त्यावेळी माझा डान्स पाहून अनेकांनी कौतूक केले होते. माझा डान्स संपुर्ण वाईमध्ये फेमस झाला होता.

माझा मित्र इनूस याने माझ्यातील कला सर्वांसमोर दाखवून दिली होती. काही दिवसांपुर्वीच तो मला सोडून गेला आहे. त्यामुळे हा डान्स मी माझ्या मित्राला समर्पित करत आहे. असं म्हणत सुर्वे काकांच्या अश्रूंचा बांध फुटला.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.