काल पुण्यातील बालगंधर्व नाट्यगृहामधील कार्यक्रमात भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला होता. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या एका महिला कार्यकर्त्याला मारहाण केली होती. यावरून राष्ट्रवादी(NCP) पक्षाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. या घटनेवरून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे संतापल्या आहेत.(suriya sule angry on bjp and rashtrvadi fight)
यानंतर कोणत्याही पक्षातील कुठल्याही पुरुषाने महिलेवर हात उचलला, तर स्वतः तिथे जाऊन हात तोडून हातात देईन, अशा शब्दांत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी इशारा दिला आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जळगावमध्ये महागाईच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं होतं. यावेळी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे देखील उपस्थित होत्या.
या आंदोलनादरम्यान राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी सुप्रिया सुळे यांनी भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या वादावर देखील भाष्य केलं आहे. “भाजप पक्षातील एक कार्यकर्ता महिलेवर हात उचलतो. याची त्या पक्षाला लाज वाटली पाहिजे. महिलेवर हात उचलणाऱ्या कार्यकर्त्याला भाजपने पक्षातून बाहेर काढले पाहिजे”, असे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
“यापूर्वी महाराष्ट्रात असे कृत्य कधीच झाले नाही. पण भाजपने हे कृत्य केले आहे. भाजपकडून महिलांवर असाच अन्याय होत राहिल्यास आम्ही आमच्या भाषेत त्यांना धडा शिकवू. महिलांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. महिलेच्या अंगावर एकदा हात उगारला. पुन्हा उगारु नका. कारण आता अति झालं आहे. अन्यथा या कार्यकर्त्यांचे घरातून बाहेर वांदे होतील”, असे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की, “माझ्या महिला कार्यकर्त्याने चुकी केली असती तर मी स्वतः यांची माफी मागितली असती. माफी मागण्यामध्ये काही कमीपणा नाही. जे चूक आहे ते चूकच आहे. पण एखादी घोषणा दिल्याने हात उगारला जातो, हाच यांचा पुरुषार्थ आहे का?”, असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे.
काल एका पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या कार्यक्रमावेळी भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमने सामने आले होते. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली होती. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री स्मृती इराणी देखील उपस्थित होत्या. या कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी भाजप विरोधात घोषणाबाजी केली होती. यांनतर भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला होता.
महत्वाच्या बातम्या :-
सरकारने ताजमहाल आणि कुतूबमिनार लवकरात लवकर हिंदूंच्या ताब्यात द्यावे; चक्क काॅंग्रेस नेत्याची मागणी
‘या’ वेब सिरीजमध्ये अभिनेत्रींनी बोल्डनेसची हद्द केलीये पार; लहान मुलांसमोर बिलकूल बघू नका ही सिरीज
आर्थर रोड जेलच्या अधीक्षकांनी महिला कैद्यासोबत केलं ‘हे’ भयानक कृत्य; पोलिसही हादरले