आयपीएल २०२२ च्या मेगा लिलावात अनेक अनपेक्षित गोष्टी पाहायला मिळाल्या. यापैकी एक म्हणजे मिस्टर आयपीएल अशी ओळख असणाऱ्या सुरेश रैनाला(Suresh Raina) या लिलावात कोणत्याही संघाने विकत घेतले नाही. यामुळे त्याचे चाहते नाराज झाले आहेत. सुरेश रैनाला त्याचा जुना संघ सीएसके ने देखील विकत घेण्यात रस दाखवला नाही.(suresh raina with new ipl team )
आयपीएल २०२२ च्या मेगा लिलावात त्याचे नाव 2 वेळा घेण्यात आले. पण कोणत्याही संघाने त्याच्यावर बोली लावली नाही. यामुळे सुरेश रैना देखील भावनिक झाला. आयपीएल स्पर्धेच्या १५ वर्षांच्या इतिहासात भारतीय अष्टपैलू खेळाडू सुरेश रैना २ कोटींच्या मूळ किंमतीसह लिलावात उतरला होता. पण, चेन्नई सुपर किंग्ज(CSK) संघाने त्याला ना रिटेन केले ना लिलावात विकत घेतले.
त्यामुळे सुरेश रैना यापुढे काय करणार याकडे त्याच्या चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुरेश रैना आरसीबी या आयपीएलमधील संघाशी जोडला जाऊ शकतो. पण आरसीबी(RCB) संघामध्ये तो कोणती भूमिका बजावणार आहे, याबद्दल अद्याप माहिती मिळाली नाही. आरसीबी आणि सुरेश रैना यांच्यामध्ये चर्चा सुरु असल्याचे सांगितले जात आहे.
आयपीएल २०२२ चा मेगा लिलाव आता संपला आहे. पण आरसीबी संघ सुरेश रैनाला सामील करून घेण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे समोर आले आहे. डावखुरा फलंदाज सुरेश रैनाने चेन्नई सुपर किंग्जला अनेक सामन्यांमध्ये विजय मिळवून दिला आहे. एवढेच नाही तर चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम देखील त्याच्या नावावर आहे.
याशिवाय सुरेश रैना क्षेत्ररक्षणातही अप्रतिम कामगिरी करतो. आत्तापर्यंत त्याने सीएसकेसाठी १०० पेक्षा जास्त झेल घेतले आहेत. सुरेश रैना एक ऑलराऊंडर खेळाडू आहे. सुरेश रैनाकडे आयपीएल लीगमधील अनुभव देखील आहे. त्यामुळे आरसीबी संघ सुरेश रैनाला संघात सामील करून घेण्यासाठी विचार करत आहे.
सुरेश रैनाने आयपीएल २०२० मध्ये सिजनच्या मधूनच माघार घेतली होती आणि भारतात परतला होता. कोरोनामुळे यूएईमध्ये आयपीएल झाली होती. काही वादामुळे रैना त्या मोसमात खेळला नाही, असे मानले जाते. यानंतर रैनाने आयपीएल २०२१ मध्ये नक्कीच पुनरागमन केले पण त्याला महत्त्वाच्या सामन्यांपासून दूर ठेवण्यात आले होते.
महत्वाच्या बातम्या :-
युवराज सिंगचे विराट कोहलीला भावनिक पत्र; म्हणाला, ‘तू माझ्यासाठी नेहमीच…’
तहसीलदारासाठी महिला कॉन्स्टेबलने नवऱ्याला सोडले अन् त्याने तिलाच संपवलं; वाचा नक्की काय घडलं
तुमच्याही कानात खाज येत असेल तर दुर्लश करू नका, वाचा त्यावरील उपाय आणि कारणे