सुरेश रैनाने बॉलीवूडपेक्षा साऊथ अभिनेत्यांवर दाखवला जास्त विश्वास, बायोपिकसाठी सुचवली ही नावं

मुंबई। आतापर्यंत आपण अनेक दिग्गज व्यक्तीचे बायोपिक चित्रपट पाहिले आहेत. एखाद्या खेळाडूंबद्दल किंवा एखाद्या रिअल स्टोरीवर आधारित चित्रपट पाहण्यासाठी चाहत्यांना देखील खूप आवडतं असतात. दरम्यान सध्या भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैनावर बायोपिक येत असल्याचा चर्चा रंगल्या आहेत. सुरेश रैनाने तो आपल्या बायोपिकसाठी तयार असल्याचे सांगितले आहे.

नुकत्याच एका लाइव्ह मुलाखती दरम्यान त्याच्या या बायोपिकमध्ये त्याची भूमिका एका साऊथ अभिनेत्याने साकारावी अशी त्याने इच्छा व्यक्त केली आहे. व यासाठी त्याने दोन कलाकारांची नावे समोर आणली आहेत. सुरेश रैनाला त्याच्या बायोपिकशी निगडीत काही प्रश्न विचारण्यात आले होते.

कोणत्या अभिनेत्याने त्याची व्यक्तीरेखा साकारावी या प्रश्वावर तो म्हणाला, ” साउथमधील अभिनेत्याने माझी भूमिका साकारावी. कारण चेन्नई आणि चेन्नई सुपर किंग्स माझ्यासाठी किती महत्वाचं आहे हे ते उत्तमरित्या समजू शकतात. माझ्या डोक्यात दोन तीन नावं आहेत. मला वाटतं सूर्याने माझी व्यक्तीरेखा साकारावी तो ही भूमिका उत्तमपणे साकारू शकतो.

शिवाय दुलकर सलमानदेखील एक चांगला अभिनेता आहे. त्याचा अभिनय देखील उत्कृष्ट आहे.” असं म्हणत सुरेशने बॉलिवूडला पाठ फिरवत साउथ हिरोंना बायोपिकसाठी पहिली पसंती दिलीय. रैनाचं नुकतच ‘Believe : What Life and Cricket Taught Me’ हे आत्मचरित्र प्रकाशित झालंय. सध्या सुरेश रैना या पुस्तकाचं प्रमोशन करताना दिसतोय.

क्रिकेट आणि आयुष्यातील अनुभवातून शिकायला मिळालेल्या गोष्टींचा उलगडा त्याने या पुस्तकात केलाय. त्यानंतर आता त्याच्या अनेक लाइव्ह मुलाखती घेतल्या जात आहेत. याआधीही क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीचाही बायोपिक प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

व त्याच्या या बायोपिकवर चाहत्यांनी भरभरून प्रेम दिल आहे. त्यानंतर आता रैनाच्या बायोपिक पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. व आता रैनाच्या या मुलाखतीनंतर आता त्याची भूमिका कोण साकारणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.