राजकारणात धुमाकूळ घालणारे बंटी आणि बबली कोण? माज़ी पोलीस अधिकाऱ्याने केले खळबळजनक आरोप

मुंबई : पोलीस महासंचालक परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रानंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. देशमुख यांच्या राजीनाम्यासाठी विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे देखील कमालीचे आक्रमक झालेत.

तर दुसरीकडे माजी पोलिस अधिकारी सुरेश खोपडे यांची फेसबूक पोस्ट व्हायरल होतं आहे. ‘गृहमंत्र्यांनी एका कनिष्ठ अधिकाऱ्याला शंभर कोटी वसूल करण्याचा आदेश दिला होता, असा आरोप पोलिस आयुक्तांनी केला ही तशी गंभीर घटना. विरोधी पक्ष नेत्याने दखल घेणे रास्त आहे. पण त्याला काही मर्यादा? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

फेसबुक पोस्टमध्ये सुरेश खोपडे म्हणतात…
महाराष्ट्राच्या राजकारणात धुमाकूळ घालणारे बंटी आणि बबली !
गृह मंत्र्यांनी एका कनिष्ठ अधिकाऱ्याला शंभर कोटी वसूल करण्याचा आदेश दिला होता असा आरोप पोलिस आयुक्तांनी केला ही तशी गंभीर घटना. विरोधी पक्ष नेत्याने दखल घेणे रास्त आहे. पण त्याला कांहीं मर्यादा? हे महाभाग मीडियाच्या माध्यमातून स्वतःच तपासी अंमलदार व स्वतःच न्यायाधीश बनून निवाडा करीत आहेत.

जनतेला हातोहात फसवून आपला स्वार्थ साधणारी एक जोडी बंटी आणि बबली या नावाने चित्रपटात झळकली होती.ती अनेक क्षेत्रात दिसते.

कोरोनाचा फैलाव वाढतोय. अवकाळी पावसानं बळीराजा धास्तावलाय. पेट्रोल डिझेल भडकलय……..! समश्याच समस्या! पण टीव्ही लावलाकी बंटी दिसतो. हातात कागदाच भेंडोले. शंभर कोटी,शंभर कोटी…. याला बदला,त्याचा राजीनामा घ्या….असा आरडाओरडा चालू असतो. त्याच काम महत्वाच दिसत.आहे. पण बारा कोटी माणसांना कडेही पाहायला पाहिजे ना?

आता त्याच्या सोबत पूर्वी महाराष्ट्राच्या गुप्त वार्ता विभागात काम केलेली रश्मी नावाची आयपीएस अधिकारी आली. काल पासून ही बंटी बबलीची जोडी मिडियात धुमाकूळ घालतेय.

हा बंटी वरवर साधा जन्माने सत्व गुणी,देव योनीतील ब्राह्मण आहे असे सांगतो पण त्याच्या अंगात नाना( फडणवीसी?)कळा आहेत. हा सत्तेची पुंगी वाजवत बाहेर पडला. मग चांद्या पासून बांध्या पर्यंत देशमुख,पाटील, माळी, साळी, धनगर,आदिवासी,दलीत,बारा बलुतेदार…. यांची पोर सत्तेच्या पुंगीचा आवाज ऐकुन देहभान विसरून लाज लज्जा,उपकार,विचारधारा गुंडाळून याच्या मागे चालू लागली………आणखी खूप कांहीं!

ही बबली नागपूरला सात वर्षे पेक्षा जास्त काळ होती. बंटी ला राखी बांधत सुर जुळले. राखीच्या मोबदल्यात तिला पुण्याची कोतवाली/जहागिरी मिळाली. तिच्या सारा वसुलीच्या सुरस कथा पोलिस स्टेशन मधून आज ही ऐकायला मिळतात. बहुमत मिळालेल्या बंटीला महाराष्ट्राची पेशव्यांची गादी मिळावी म्हणून बबलीने महाराष्ट्राचा सगळा गुप्त वार्ता विभाग(SID) कामाला लावला.पण हाय.

मग तिने फोन टॅप करून खरी खोटी माहिती बंटी पर्यंत पोचविली. बंटी दिल्लीतील सराईत, तडीपारी भोगलेल्या,खोटे एन्काऊंटर,खून पचविल्याचा दांडगा अनुभव असलेल्या आपल्या फिलॉसॉफर, गाईड कडून वेळोवेळी सल्ला घेत सगळ वातावरण गढूळ ,व घाणेरडं बनवले आहे.

त्या मंत्र्याचे ,अधिकाऱ्याचे काय करायचे ते करा त्याच्याशी आम्हाला देणे घेणे नाही. बारा कोटी जनतेच्या इतर ही समस्या आहेत. इथले प्रश्न घटनात्मक पद्धतीने सोडवावे असेही वाटते. प्रत्येकाला आपले ध्येय साध्य करण्याचा हक्क आहे.

पण “साध्या बरोबर साधन ही शुद्ध असणे महत्वाचे असते ” तसेच “सगळ्यात दुबळ्या माणसासाठी कामकरा”असे आमचे गांधी बाबा सांगत म्हणून जगभर त्यांचा आदर केला जातो.सनातनी ब्राह्मणी विचारावर आधारित पेशवाई आणण्या साठी धुंद झालेल्या सत्तेतील बंटी आणि बबलीला हे समजेलच! नाहीतर समजावून सांगावे लागेल!!

महत्त्वाच्या बातम्या 

एप्रिलपासून तुमच्या हातात येणार कमी पगार, मोदी सरकार लवकरच घेणार हा निर्णय

नारायण राणेंच्या अडचणी वाढल्या! ‘आधिश’ बंगल्याचा तहसीलदारांकडून पंचनामा

अभिनेत्री लिसा हिडेन तिसऱ्यांदा होणार आई; व्हिडिओ शेअर करत दिली चाहत्यांना माहिती

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.