Share

Suresh Kalmadi : राष्ट्रकूल घोटाळा प्रकरणी सुरेश कलमाडींची निर्दोष मुक्तता; राजकीय अस्तित्व संपल्यानंतर आला निर्णय

Suresh Kalmadi : 2010 साली दिल्ली येथे पार पडलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धा घोटाळा प्रकरणात मोठी घडामोड घडली आहे. काँग्रेसचे माजी मंत्री आणि स्पर्धा आयोजन समितीचे तत्कालीन अध्यक्ष सुरेश कलमाडी(Suresh Kalmadi) यांना अंमलबजावणी संचालनालयाकडून (ED) अखेर क्लीनचिट मिळाली आहे. तब्बल 15 वर्षांनी दिल्लीतील विशेष न्यायालयाने ईडीचा क्लोजर रिपोर्ट स्वीकारत प्रकरणावर पडदा टाकला.

या निर्णयामुळे पुण्यात कलमाडी समर्थकांनी जल्लोषात प्रतिक्रिया व्यक्त केली. दीर्घकाळ राजकीय निष्क्रियतेत गेलेले कलमाडी यांच्यासाठी ही मोठी दिलासादायक बाब मानली जात आहे.

प्रकरणाचा मागोवा:
2010 मध्ये झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये भ्रष्टाचार आणि आर्थिक अनियमिततेचे आरोप झाले होते. विरोधी पक्षांनी जोरदार आवाज उठवत, सुरेश कलमाडी, तत्कालीन सरचिटणीस ललित भानोत आणि इतरांवर आरोप केले होते. यामुळे कलमाडी यांचे राजकीय आयुष्य थांबले.

CBI आणि EDच्या चौकशा:
या प्रकरणात CBI आणि EDने स्वतंत्रपणे तपास सुरू केला. CBIने दोन कंत्राटांमध्ये गैरव्यवहाराच्या आरोपांवर चौकशी करून 2014 मध्येच क्लोजर रिपोर्ट सादर केला होता. CBIने म्हटले की, कोणताही गुन्हेगारी पुरावा मिळाला नाही आणि आरोप सिद्ध झाले नाहीत.

त्यानंतर EDने मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी चौकशी सुरू केली होती, परंतु आता EDनेही कोणताही आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा ठोस पुरावा नसल्याचे स्पष्ट करत प्रकरण बंद करण्याचा अहवाल न्यायालयात सादर केला.

विशेष न्यायाधीश संजीव अग्रवाल यांनी दोन्ही तपास यंत्रणांचे अहवाल पाहून प्रकरण बंद करण्याचा निर्णय दिला.

कलमाडी समर्थकांचा जल्लोष:
हा निर्णय आल्यानंतर पुण्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आणि मिठाई वाटून आनंद साजरा केला. सुरेश कलमाडी यांच्या प्रतिमेचे पुन्हा एकदा पुनर्वसन होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
suresh-kalmadi-acquitted-in-commonwealth-scam-case

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now