Share

Suraj Chavan Wedding: अरेंज नाही, भावाचं लव्ह मॅरेज हाय; गुलिगत स्टार सूरज चव्हाण मामाच्या मुलीसोबत अडकणार लग्नबंधनात

Suraj Chavan Wedding: ‘बिग बॉस मराठी 5’ (Bigg Boss Marathi 5) च्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरणारा आणि घराघरात लोकप्रिय झालेला ‘गुलिगत स्टार’ सूरज चव्हाण (Suraj Chavan) पुन्हा एकदा चर्चेत आलाय, पण यावेळी कारण वेगळं आहे. छोट्या पडद्यावरून लाखो चाहत्यांची मने जिंकणारा हा कलाकार आता आपल्या आयुष्याच्या नव्या टप्प्याकडे पाऊल टाकतोय. होय, सूरज लवकरच विवाहबंधनात अडकतोय.

काही दिवसांपासून “सूरज लग्न कधी करणार?” या चर्चांनी सोशल मीडियावर जोर धरला होता. अखेर त्यावर पडदा पडला आहे. सूरजचा विवाहसोहळा 29 नोव्हेंबर रोजी पारंपरिक पद्धतीने पुण्याजवळील जेजुरी (Jejuri) आणि सासवड (Saswad) येथे पार पडणार आहे. लग्नाआधीचे सर्व विधी – हळद, मेहंदी आणि संगीत – हे 28 नोव्हेंबरपासून सुरू होतील.

सूरज चव्हाणची होणारी पत्नी कोण?

काही दिवसांपूर्वी सूरजनं आपल्या होणाऱ्या पत्नीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. मात्र, त्यात तिचा चेहरा लपवण्यात आला होता. त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता अधिक वाढली होती. अखेर ही गुपित पडदा उघड झाला आहे. सूरजची होणारी पत्नी म्हणजेच संजना (Sanjana) – आणि गंमत म्हणजे ती त्याच्या चुलत मामाची मुलगी आहे. म्हणजेच सूरजचं लग्न अरेंज नसून अगदी लव्ह मॅरेज आहे.

‘कोकण हार्टेड गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी अंकिता वालावलकर (Ankita Walawalkar) हिनं लोकमत सखीशी बोलताना ही माहिती दिली. तिनं सांगितलं की, सूरज आणि संजना लहानपणापासूनच एकमेकांना ओळखतात. त्यांच्या प्रेमाची सुरुवात नात्यातूनच झाली आणि आता ते विवाहबंधनात अडकणार आहेत.

अंकिताची खास मदत

सूरजच्या लग्नात अंकिता उपस्थित राहू शकणार नाही, कारण त्याच दिवशी तिच्या कुटुंबातही लग्न समारंभ आहे. पण तरीही तिनं सूरज आणि संजना या दोघांना लग्नाच्या तयारीत भरपूर मदत केली. संजनाच्या साड्या निवडण्यापासून ते सूरजच्या कपड्यांची निवड करण्यापर्यंत अंकिता दोघांसोबत होती. तिच्या व्लॉगमध्ये या लग्नाची तयारी आणि ‘केळवण’ समारंभाचे काही खास क्षण पाहायला मिळतात.

सूरजच्या या लग्नामुळे त्याचे चाहते अत्यंत आनंदात आहेत. ‘बिग बॉस मराठी’तून मिळालेलं प्रेम आणि आता वैयक्तिक आयुष्यातील हे नवीन पाऊल. दोन्ही त्याच्यासाठी खास आहेत. सोशल मीडियावर सध्या सूरज आणि संजनावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे.

ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now