सुरैयाच्या प्रेमात पागल झाले होते देवानंद; पण ‘या’ गोष्टीमूळे लग्न होऊ शकले नाही

देवानंदला बॉलीवूडचे सदाबहार अभिनेते बोलले जाते. फिल्मी पडद्यावर त्यांना खुप पसंत केले गेले. ब्लॅक अँड व्हाइट सिनेमे असो किंवा कलरफुल सिनेमे देवानंदला नेहमीच प्रेक्षकांचे प्रेम मिळाले आहे.

चित्रपटांमध्ये ते जेवढे रोमँटिक होते. तेवढेच खऱ्या आयुष्यात देखील होते. त्यांच्यावर अनेक सामान्य मुली प्रेम करत होत्या. फिल्म इंडस्ट्रीतील अनेक अभिनेत्री देखील देवानंदवर फिदा होत्या. देवानंदचे अनेक अभिनेत्रींसोबत अफेअर होते.

झीनत अमान – झीनत अमानने देवानंदसोबत ‘हरे रामा हरे कृष्णा’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये डेब्यु केला होता. या चित्रपटात त्यांनी देवानंदसोबत काम केले. पहिल्याच चित्रपटा वेळी देवानंद झीनतच्या सौंदर्याने घायाळ झाले होते.

देवानंद झीनतवर खुप जास्त प्रेम करत होते. झीनत देखील देवानंदच्या प्रेमात पडल्या होत्या. या दोघांनी हिरा पन्ना, इश्क इश्क इश्क, वॉरंट, डार्लिंग डार्लिंग या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. पण या दोघांचे रिलेशनशिप जास्त काळ टिकू शकले नाही.

टिना मुनीम – १९७८ मध्ये देवानंदने ‘देस परदेस’ चित्रपटातून टिनाला बॉलीवूडमध्ये लाँच केले होते. त्यामुळे या दोघांमध्ये खुप चांगले नाते होते. शुटिंग वेळी दोघांमध्ये खुप जास्त जवळीक वाढत होती. हळूहळू हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले.

दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. दोघांच्या अफेअरच्या चर्चा खुप वाढत होत्या. त्यामुळे दोघांमध्ये वाद व्हायला सुरुवात झाली. पण या दोघांचे नाते जास्त काळ टिकू शकले नाही. देवानंद आणि टिना मुनीमचे ब्रेकअप झाले.

सुरैया – बॉलीवूडच्या सर्वात सुंदर अभिनेत्रींमध्ये सुरैयाचे नाव येते. सुरैयाने देवानंदसोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. दोघांचे नाते खुप सुंदर सुरू होते. पण या दोघांच्या प्रेमात धर्म आडवा आला होता. सुरैया मुस्लिम होत्या आणि देवानंद हिंदू होते. म्हणून या दोघांच्या घरच्यांनी या लग्नाला नकार दिला.

या गोष्टीबद्दल देवानंदने त्यांच्या बायोपिकमध्ये देखील लिहिले आहे. चित्रपटाच्या शुटिंग वेळी सुरैया पाण्यात पडल्या होत्या. त्यावेळी देवानंदने त्यांचा जीव वाचवला होता. त्यानंतर दोघांच्या प्रेम कहाणीची सुरुवात झाली होती. पण ही प्रेम कहाणी जास्त काळ टिकू शकली नाही.

महत्त्वाच्या बातम्या –

विराट कोहलीच्या आईने नकार दिला नसता तर आज ‘ही’ हॉट मुलगी त्याची पत्नी असती

कंगना राणावतची बोलती बंद करणाऱ्या दिलजीत दुसांजची खरी कहाणी वाचा

‘रंगीला’ गर्ल ऊर्मिला मातोंडकरच्या नवऱ्याला तुम्ही पाहिले नाही? पहा फोटो

फक्त दहा चित्रपटांमध्ये रश्मीका मंदाना कशी झाली साऊथची टॉपची अभिनेत्री

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.