Share

“महाराष्ट्राच्या मातीविरोधात जास्त बोलू नका, अन्यथा महिला लाटणे घेऊन मागे लागतील”

गेल्या काही दिवसांपासून मशिदींवरील भोंग्यांवरून राजकारण तापलं आहे. गुढीपाडवा मेळाव्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. ३ मे पर्यंत मशिदींवरील भोंगे काढावेत, असं अल्टिमेटम राज ठाकरे(Raj Thakre) यांनी राज्य सरकारला दिलं आहे. यामुळे राज्यात सध्या मशिदींवरील भोंग्यांवरून राजकारण तापलं आहे.(supriya sule statement on raj thakre )

मशिदींवरील भोंग्यांच्या भूमिकेवरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. “महाराष्ट्राच्या मातीविरोधात जास्त बोलू नका; अन्यथा महिला लाटणे घेऊन मागे लागतील. त्यांनी लाटणे घेतले तर तुमचे काही खरे नाही”, अशा शब्दांत खासदार सुप्रिया सुळे यांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे.

आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. “राज ठाकरे केवळ भाषणे करतात. लोकांना देव, धर्मावरून भडकवतात”, असे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “आपण दोन वर्षांनंतर कोरोना महामारीतून बाहेर पडत आहोत. आता कुठे अर्थव्यवस्था सुरळीत होत आहे. अशा परिस्थितीत हे समाजात द्वेष पसरवत आहेत. हे स्वतः काहीही कामे करीत नाहीत. आपण मंदिरात प्रसन्न मुद्रेने जातो. पण यांचा मंदिरात गेल्यावर चेहरा पहा. त्यावर काहीही हावभाव नसतात.”

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की, “लोकांसमोर हे मराठीचा मुद्दा मांडतात. पण यांची स्वतःची मुले इंग्रजी माध्यमात शिकतात. यांच्या व्यासपीठावर एकही महिला नसते. महिलांना यांच्या पक्षात काहीही स्थान नाही. आपल्या राज्याची संस्कृती ही संतांची आहे. कुणी दगड उचलणार असेल तरी आपण विचारांची लढाईच लढली पाहिजे”, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले आहे.

मशिदींवरील भोंग्यांबाबत घेतलेल्या आक्रमक भूमिकेवरून प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडूंनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर टीका केली आहे. “मागील दोन वर्ष महाराष्ट्र कोरोनात होरपळत असताना मंदीर, मशिद, राजकीय सभा सगळे आवाज बंद होते एकच आवाज ऐकायला यायचा सेवेचा व रुग्णवाहिकेचा, यातुन प्रत्येकांनी बोध घ्यायला हवा. बंद करायचे असेल तर मंदिर, मशिदीसह राजकीय नेत्यांचे भोंगे बंद करा”, असं ट्विट आमदार बच्चू कडू यांनी केलं आहे.

महत्वाच्या बातम्या :-
मशिदीजवळ तोडफोड करणारा बुलडोजर मंदिराजवळ येताच का थांबला? लोकांनी कारवाईवर उपस्थित केले प्रश्न
…त्यामुळे चड्डीत राहायचं काय समजलं? मनसेची थेट अमोल मिटकरींना धमकी
मी एक हिंदू आहे आणि माझ्यापेक्षाही मोठा कोणी.., दुकानावर बुलडोजर चालवल्यानंतर संतापले दुकानदार

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now