पुणेकरांनी शोधलेल्या लसीवर बाहेरून आलेल्यांनी दावा करू नये’; सुप्रिया सुळेंनी दिला मोदींना इशारा

पंतप्रधान नरेंद्र मोदी काल पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटमध्ये दाखल झाले होते. त्यांनी लस निर्मिती व उत्पादनाबाबतची सद्यस्थिती जाणून घेतली. यावर सुप्रिया सुळे यांनी टीका केली. पुण्याच्या मावळमध्ये पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. पुणेकरांनी शोधलेल्या लसीवर बाहेरून आलेल्यांनी दावा करू नये’ अशी सुप्रिया सुळेंनी मोदींवर टिका केली आहे.

सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या की, तुमच्या इथे १४०० कोटी १५०० कोटींच्या गप्पा चालतात. आमच्या दिल्लीत तर १ लाख कोटीच्या गप्पा चालत असतात. या सर्व गप्पा कोण मारतं? हे तर तुम्हाला माहीतच आहे. ते आज पुण्यात आले आहेत. बघा ‘दुनिया घुम लो, हमारे पुणे के आगे कुछ नही’. असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता सुप्रिया सुळेंनी टीका केली आहे.

“संपूर्ण जग फिरून झालं पण शेवटी लस सापडली ती आमच्या पुण्यातच. ही लस पुणेकरांनी शोधली आहे. नाही तर कोणीतरी म्हणायचे की ही लस आम्ही शोधली आहे. त्यामुळे बाहेरून येणाऱ्या कोणीही आमच्या लसीवर दावा करू नये, असा इशारा सुप्रिया सुळे यांनी मोदींना दिला आहे.

पुण्याच्या मावळमध्ये पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. तर सिरम आणि ऑक्सफर्डने तयार केलेली ही लस ७० टक्के परिणामकारक आहे. पंतप्रधान मोदी सिरमच्या लस निर्मितीचा आढावा घेतला, व लस निर्मिती व उत्पादनाबाबतची सद्यस्थिती जाणून घेतली.

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.