Share

Supriya Sule : शरद पवारांनी ‘ही’ गोष्ट केली की राष्ट्रवादी लगेच सत्तेत येते; सुप्रीया सुळेंनी फोडले गुपित

Supriya Sule Sharad Pawar

Supriya Sule : राज्यात सर्वच पक्ष आगामी निवडणुकांच्या तयारीला लागले आहेत. त्यासाठी त्यांचे राज्यभर दौरेही सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी एका कार्यक्रमामध्ये बोलत असताना एक मोठे विधान केले आहे.

यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या की, इलेक्शन मध्ये काय होतं जातं हे आमच्यापेक्षा कोणीच जास्त जवळून पाहिलेलं नाही. आदरणीय शरद पवार साहेबांचं जर ५५ वर्षांचं राजकारण आणि समाजकारण पाहिलं तर त्यात जेवढे चढ आहेत, तेवढेच उतार आहेत, असे त्यांनी सांगितले.

५५ वर्षात ते २७ वर्ष सत्तेत आणि २७ वर्ष विरोधात होते, असेही त्या म्हणाल्या. तसेच मी नेहमी त्यांना सांगते की, महाराष्ट्राने तुम्हाला प्रचंड प्रेम दिलं. परंतु, विरोधात असताना महाराष्ट्राने तुम्हाला जास्त प्रेम दिले. हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे, असे त्यांनी सांगितले.

पुढे त्या म्हणाल्या की, शरद पवार विरोधात गेले न गेले की, ते दौऱ्यावर निघतात. त्यानंतर त्या दौऱ्यात काय गंमत होते माहिती नाही. काही दिवस एक महाराष्ट्राचा दौरा झाला की ते पुन्हा सत्तेत येऊन बसतात, असे वक्तव्य सुप्रिया सुळेंनी केले आहे. इंदापूर तालुक्यातील एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

तसेच कुणाला स्वप्नातही वाटले नव्हते की, महाविकास आघाडीचे सरकार येईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संपला असे सगळ्यांना वाटत होते. रोज सकाळी आम्ही उठलो की, आज कोण पक्ष सोडून गेलं हे बघायचो. एखादा दिवस कोणी गेलं नाही की, आम्हाला संध्याकाळी हुश्श व्हायचं. आज कोणीच पक्ष सोडला नाही असं वाटायचं.

मात्र, दुसऱ्या दिवशी परत एखादी बातमी असायची. इतके लोक पक्ष सोडून जात होते की, त्याला काही हिशोबच नव्हता. त्यानंतर अशी परिस्थिती झाली की, दोन्ही खिशात काहीच नव्हतं. मग शरद पवार साहेब सोलापूरला गेले आणि त्यानंतर जी कुस्ती सुरु झाली ती डायरेक्ट रिझल्टच्या दिवशीच संपली, असे सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.

महत्वाच्या बातम्या
supriya sule : बारामतीत सुप्रिया सुळे यांच्या कार्यक्रमात राडा, दोन गट आले आमनेसामने; वाचा नेमकं काय प्रकरण?
Eknath Shinde: राज्याला सध्या दोन मुख्यमंत्र्यांची गरज, एक फोटोसेशनसाठी आणि एक.., सुप्रिया सुळेंचा टोला
politics: घरात बायको जेवढी फुगत नसेल तेवढे मंत्री फुगत आहेत, सुप्रिया सुळेंचा सत्ताधाऱ्यांना टोला
राऊतांनंतर पवार कुटुंबीयांना धक्का, लवासाप्रकरणात शरद पवारांसह अजित पवार, सुप्रिया सुळेंना नोटीस

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now