‘सध्याची ईडीची अवस्था रस्त्यावर चलन कटणाऱ्याप्रमाणे’, सुप्रिया सुळे यांचा खोचक टोला

पुणे। मी खासदार झाले तरी मला ईडी आणि सीबीआयचे प्रमुख माहीत नव्हते. आज रस्त्यावर चलन काटणाऱ्या प्रमाणे ईडीची अवस्था झाली आहे, अशी बोचरी टीका राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

सध्या अनेक राजकीय नेत्यांवर घोटाळ्याचे आरोप लागल्याने ईडी कारवाई करत आहे. व याबद्दलच सुप्रिया सुळे यांनी अनेक सवाल उपस्थित केले आहेत. सुप्रिया सुळे या आज मंगळवारी औरंगाबादमध्ये आहेत. यावेळी त्या माध्यमांशी संवाद साधत होत्या, त्यावेळी त्यांनी थेट ईडीकडून होणाऱ्या कारवायांवर टीका केली आहे.

माध्यमांशी संवाद साधताना त्या म्हणाल्या की, देशाच्या राजकारणात पवार कुटुंबावर झालेल्या आरोपांऐवढे आरोप कोणावरच झालेले नाही. तरी देखील आम्ही प्रत्येकाला संयमाने उत्तर दिले. त्यामुळे आता या सर्वांची सवय झाली असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

खोटेनाटे आरोप केल्यास त्यांचं कुटुंब कुठल्या अवस्थेतून जातात याचा विचार केला पाहिजे. तत्त्वाची लढाई आणि विरोध झाला पाहिजे. पण इतकी टोकाची कटुता निर्माण होता कामा नये. नोटीस दाखवा. रेड करा आमचं काहीही म्हणणं नाही, असं सांगतानाच आमच्या अनिल देशमुख यांच्यावर सात वेळा रेड पडली.

इतक्या रेड असतात का? ईडी, सीबीआय सध्या एजन्सी नाहीत. त्यांच्या कामाला काही दर्जा आहे की नाही?, असा सवालही त्यांनी केला. पुढे त्या म्हणाल्या की वाहतूक सिग्नलवर नियमांचे उल्लंखन केल्यावर ज्या प्रमाणे वाहतूक हवालदार चलान कापतो. त्याच प्रमाणे ईडी आणि सीबीआय सारख्या संस्था काम करत असल्याचा आरोप खासदार सुळे यांनी केला.

पुढे त्या म्हणाल्या की, 10 विषयात एकच माणूस पारंगत आहे हे मला टीव्ही बघून कळतं. अफगाणिस्तान असो चायना असो अजिंठा वेरूळ असो की काहीही… कशावरही एकच माणूस चर्चा करतो. याला राजकारणी आणि मीडिया दोघेही 50 टक्के दोषी आहेत. 5 मिनिटांत 100 बातम्या? इतकं फास्ट. मी तर घाबरून टीव्ही बंद करते असं त्या म्हणाल्या.

पुढे त्या चिमटा काढत म्हणाल्या की, आमच्या घरात पेपर वाचण्याची परंपरा आहे. माझ्या वडिलांना जोपर्यंत पेपर वाचून हाताला काळी शाई लागत नाही, तोपर्यंत दिवस सुरू झाला असं वाटत नाही, असंही त्यांनी सांगितलं

 

महत्वाच्या बातम्या
ठाकरे सरकारच्या मंत्र्यांना सळो की पळो करून सोडणाऱ्या सोमय्यांचे मुंबईत जंगी स्वागत
बिग बॉस मराठीच्या घरात पहिल्याच दिवशी “या” दोन स्पर्धकांमध्ये तुफान राडा; कोण होणार एलीमीनेट?
आर्या आंबेकरचा मोठा खुलासा, प्रसिद्ध व्यक्तीला डेट करत असल्याच्या चर्चेवर सोडले मौन..
जिवंतपणीच आमदाराच्या मृत्यूची बातमी व्हायरल; संतप्त आमदार म्हणाले..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.