‘सुप्रियाताई, किरीट सोमय्यांचे लक्ष सद्या बेनामी संपत्तीवर आहे; ते वांग्याच्या शेतीकडे वळाले तर तुमचे अवघड होईल’

भाजप नेते किरीट सोमय्या आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप चालूच आहे. यामुळे राजकीय वर्तुळ चांगलेच तापलेले दिसत आहे. भाजप नेते किरीट सोमय्या हे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कारखान्याची पाहणी करण्यासाठी कोल्हापूरकडे निघाले होते.

किरीट सोमय्या महालक्ष्मी एक्सप्रेसने मुंबई CSMT स्टेशनवरून कोल्हापूरला रवाना झाल्यासाठी निघाले होते. मुंबईत सोमय्या यांना रोखण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला. कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांनी विनंती केल्यानंतर सोमय्या महालक्ष्मी एक्स्प्रेसमधून कराड येथे उतरले होते.

कोल्हापूरमध्येही राष्ट्रवादी कार्यकर्ते किरीट सोमय्यांसाठी चप्पल घेऊन उभे होते. याच प्रकरणावर औरंगाबादमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांनी किरीट सोमय्या यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. “केंद्रीय यंत्रणा चलन फाडणाऱ्या पोलिसांसारखे वाटत आहेत. तसेच किरीट सोमय्या हे सीबीआयचे प्रमुख आहेत का, की ईडीचे डायरेक्टर आहेत का?” अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

दरम्यान सुप्रिया सुळे यांच्या याच वक्तव्याला आता भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सचिव प्रदीप गावडे यांनी प्रत्युत्तर दिले. ‘ताई किरीट सोमय्या कोण आहेत हे अनिल देशमुख, अनिल परब, भावना गवळी, हसन मुश्रीफ यांना विचारा, उगाच त्यांना डिवचू नका, त्यांचे लक्ष सध्या बेनामी संपत्तीवर आहे, उगाच वांग्याच्या शेतीकडे वळाले तर तुमचे अवघड होईल.’ अशी सूचक टीका सुप्रिया सुळे यांच्यावर केली आहे.

यानंतर किरीट सोमय्या यांनी कराड येथे पत्रकार परिषद घेतली. तसेच, दोन दिवसांनी कोल्हापूरला येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. कोल्हापूरला संघर्ष सध्याला टळला असला तरी किरीट सोमय्या यांच्या पुढच्या कोल्हापूर दौऱ्यावर काय होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

महत्वाच्या बातम्या
सपना चौधरीच्या एक्सिडेंटच्या अफवांमुळे कुटुंबाला काय काय भोगावे लागले? वाचून डोळ्यात पाणी येईल
राज्यपालांच्या पत्राला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे सडेतोड उत्तर; देशभरात होतेय चर्चा
प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा गोव्यातील खाडीत कार कोसळून मृत्यू; पहिला चित्रपट रिलीज होण्याआधीच दुर्दैवी अंत
यापुढे किर्तनकार पद लाऊ नका! बिग बाॅसमध्ये गेल्याने शिवलीला पाटलांवर महाराज मंडळी भडकली

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.