सुप्रीम कोर्टानंतर आता रघुराम राजन यांनी केंद्राला झापले, म्हणाले, महाराष्ट्राला जमले मग देशाला का नाही?

नवी दिल्ली । देशात कोरोना परिस्थिती अजूनही भयानक अवस्थेत आहे. रुग्णांना अजूनही ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर, रेमडेसीवीर इंजेक्शन मिळत नाहीत. आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. यामुळे काही दिवसांपूर्वी कोर्टाने केंद्र सरकारला फटकारले होते.

आता देखील केंद्र सरकारकर टीका केली जात आहे. आता कोरोना नियंत्रणात देश अपयशी झाल्याप्रकरणी रिझर्व बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी कोरोना परिस्थती हाताळण्यावरून महाराष्ट्र सरकारचे कौतुक करत महाराष्ट्र सरकार ऑक्सिजन बेड तरी पुरवू शकले. मात्र, इतर सरकारांना ऐवढे सुद्धा करता आले नाही, असे म्हणत त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली.

देशात कोरोना रुग्णांचा आकडा तीन लाखांवर जात असून दुसरी लाट रोखण्यात केंद्र सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याचे रघुराम राजन म्हणाले. सरकारमधील कमकुवत नेतृत्व आणि दूरदृष्टीचा अभाव म्हणून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशाचे मोठे नुकसान केले, असे ते म्हणाले होते.

रघुराम राजन यांनी त्यांनी कोरोना परिस्थती हाताळण्यावरून महाराष्ट्र सरकारचे कौतुक केले. दिल्लीमध्ये ते एका कार्यक्रमात ते बोलत होते. त्यांनी कोरोनामुळे आलेल्या आर्थिक संकटातून बाहेर कसे यायचे हे देखील यावेळी सांगितले.

ते म्हणाले, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रासाठी भारताने दिवाळखोरी प्रक्रिया सुरू करण्याची त्वरित आवश्यकता आहे. महामारीनंतर समाजाकडे आपण गांभीर्याने प्रश्न विचारले नाही. तर ही महामारी इतकीच मोठी शोकांतिका ठरेल. कधीकधी आपण लपून नव्हे. तर उघडपणे सुधारणा करणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.

देशात कोरोना पसरल्यानंतर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे आर्थिक आव्हान उभे राहिले आहे. यावर लवकरात लवकर उपाय योजना करणे गरजेचे आहे. कोरोना परिस्थितीवरून गेल्या काही दिवसांपासून विविध स्थरातून मोदी सरकारवर टीका केली जात आहे.

ताज्या बातम्या

डोळ्यादेखत रुग्ण जीव सोडताहेत, आम्हाला काहीच करता येत नाही; फेसबूक लाईव्हमध्ये डॉक्टर ढसाढसा रडले

‘मिस यू भाऊ’! पुण्यात सराईत गुंडाच्या अंत्यविधीला १२५ बाईक्सची रॅली; हजारोंची गर्दी

मराठमोळ्या श्रेयसला बाॅलीवूडमध्ये सिनेमे का मिळत नाहीत? स्वत: श्रेयसनेच सांगीतले ‘ते’ घाणेरडे कारण

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.