अर्णब गोस्वामींचा जामीन वाढवत सर्वोच्च न्यायालयाने ठाकरे सरकारला दिला झटका, म्हणाले…

मुंबई | अभिनेत्री कंगना राणावतचे ऑफिस मुंबई महापालिकेने अनधिकृत सांगत तोडल्यानंतर कंगणाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्याचा निर्णय आज मुंबई हायकोर्टाने दिला आणि मुंबई महापालिकेची ही कारवाई अवैध ठरवली.

तसेच कंगणाला भरपाई देण्यासाचे आश्वासन दिले आहे. नुकसानाची चौकशी करून भरपाई देण्यात यावी असा आदेश हायकोर्टाने दिला. याचदरम्यान, अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आली होती.

हे प्रकरणसुद्धा खूप चिघळले होते. यानंतर ठाकरे सरकार वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. नंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले होते मग राज्य सरकारला दणका देत सर्वोच्च न्यायालयाने अर्णब गोस्वामी यांचा जामीन मंजूर केला होता.

आता याच प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने ठाकरे सरकारला पुन्हा एकदा झापले आहे.  राज्य सरकार काही व्यक्तींना निशाण्यावर ठेऊन त्यांच्यावर कारवाई करणार असेल, तर त्यांची सुप्रीम कोर्ट नागरिकांच्या अधिकारांचे संरक्षण करेल, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारला झटका दिला आहे.

एवढच नाही तर अर्णब गोस्वामी यांच्या जामीनाचा कालावधी तीन महिन्यांनी वाढवण्यात आला आहे. त्यांना ११ नोव्हेंबरला अंतरिम जामीन मंजूर झाला होता. दोन्ही प्रकरणात राज्य सरकार तोंडावर पडलेले दिसत आहे कारण दोन्ही प्रकरणात न्यायालयाने राज्य सरकारच्या विरोधात निर्णय दिला आहे.

महत्वाच्या बातम्या-

लाईव्ह शोमध्ये गौतम गंभीर आणि आकाश चोप्रा आमने सामने; ‘हा’ आहे वादाचा मुद्दा

मालामाल होतोय धोनी! शेतातील टोमॅटो आणि दुधाची सूरू झाली विक्री; किंमत तर बघा..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.