सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, माहेरच्या लोकांना संपत्ती देण्याचा महिलांना हक्क

नवी दिल्ली- गूरूग्राम येथील एका प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. विधवा महिलेच्या वाट्याला आलेली जमीन तीने तिच्या भावाच्या मुलाच्या नावावर केली होती. याबाबत सासरच्या लोकांनी याचिका दाखल केली होती. त्यानंतर न्यायालयाने महिलेच्या बाजूने निकाल दिला आहे.

गूरूग्राममधील बाजीदपूर गावातील बबलू नावाचा एक व्यक्ती होता. त्याला दोन मुले होती. शेर सिंह आणि बाली अशी त्यांची नावे होती. शेरसिंह याच १९५३ साली निधन झाल्यानंतर त्याच्या पत्नीमध्ये आणि दिराच्या मुलांमध्ये संपत्तीवरून वाद सूरू झाला होता. तिने तिच्या वाट्याला आलेली जमीन भावाच्या मुलाच्या नावावर केली होती.

शेरसिंहच्या भावाच्या मुलांनी याला न्यायालयात आव्हान दिले होते. त्यानंतर प्रकरणाची सुनावणी कोर्टात सूरू झाली. न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून शेरसिंहच्या पत्नीच्या बाजूने निकाल दिला आहे.

न्या. अशोक भूषण आणि न्या. सुभाष रेड्डी यांच्या खंडपीठाने असं स्पष्ट केलं की, घटनेतील कलम १५(१) (d) नुसार महिलेच्या माहेरच्या लोकांना संपत्तीच्या वारसा हक्कामध्ये समाविष्ट करण्यात काही गैर नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

महिलेला मुलगा नसल्याने तिने तिच्या वाट्याला आलेली जमीन भावाच्या मुलाच्या नावावर केल्याने तिच्या पतीच्या भावाच्या मुलांनी भांडणे काढली होती. तसेच त्यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती. हे प्रकरण तब्बल तीस वर्षे चाललं होतं.
महत्वाच्या बातम्या-
महिलेसोबत अरेरावी आणि राज ठाकरेंचा एकेरी उल्लेख, मनसैनिकांनी कर्मचाऱ्याला दिला चोप
मुंबई पोलिसांनी दंड आकारताच विवेक ओबेरॉयने व्हिडिओ केला शेअर, म्हणाला…
हुंड्यात मिळाले ११ लाख रुपये, भर लग्नात वरपित्याने केले असे काही की, तुम्हीही कराल कौतुक
संजय राठोडांना शक्तीप्रदर्शन महागात पडणार? मुख्यमंत्र्यांसह शरद पवारही नाराज

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.