Share

सुप्रीम कोर्टानेच रद्द केली बलात्काऱ्याची शिक्षा; म्हणाले आम्हाला त्यांच्या कौटूंबीक जीवनात अडथळा आणायचा नाही

high court

एका व्यक्तीवर आपल्याच अल्पवयीन भाचीवर बलात्कार केल्याचा आरोप होता. या प्रकरणात न्यायालयाने त्याला पॉक्सो कायद्यांतर्गत दहा वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर आरोपीने या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात(Supreme Court) धाव घेतली. ९ मे रोजी या प्रकरणातील सुनावणी सर्वोच्च न्यायालयात पार पडली.(Supreme Court Canceled rape accused punishment)

यावेळी सर्वोच्च न्यायालयाने विशेष परिस्थितीचा हवाला देऊन आरोपी व्यक्तीची शिक्षा रद्द केली. या निर्णयाला उदाहरण म्हणून घेऊ नये, असे सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले आहे. आरोपी व्यक्ती हा पीडित अल्पवयीन मुलीचा मामा असल्याची माहिती मिळत आहे. या निर्णयाची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण भारतातील काही समुदायांमध्ये मामा आणि भाची लग्न करतात. हे बघून आरोपीने अल्पवयीन मुलीला लग्नाचे आश्वासन दिले होते. त्यावेळी पीडित मुलीचे वय १४ वर्ष होते. या घटनेनंतर आरोपीने पीडित मुलीसोबत लग्न केले. घटनेच्या एका वर्षानंतर अल्पवयीन पीडितेने एका मुलाला जन्म दिला.

पण त्या व्यक्तीवर अल्पवयीन भाचीवर बलात्कार केल्याचा आरोप होता. या प्रकरणात मद्रास उच्च न्यायालयाने आरोपीला १० वर्षांची शिक्षा सुनावली होती. यानंतर आरोपीने मद्रास उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. या याचिकेच्या माध्यमातून आरोपीने सर्व गुन्हे रद्द करण्याची मागणी केली होती.

आरोपीने याचिका दाखल करताना म्हंटले होते की, “पीडित मुलीला मी लग्नाचे वचन दिले होते. त्यानुसार मी त्या मुलीशी लग्न केले.” यावर पीडित मुलगी म्हणाली की, “आता आम्हा दोघांना दोन मुले आहेत. आमच्या दोघांचे कौटुंबिक जीवन चांगले चालले आहे. माझे पती आमची काळजी घेत आहेत. आता आम्ही आनंदी जीवन जगत आहोत”, असे पीडित मुलीने सांगितले होते.

पीडितेचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने आरोपीची शिक्षा रद्द केली आहे. या घटनेनंतरची संपूर्ण परिस्थिती पाहता हा निर्णय घेण्यात येत असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. तसेच भविष्यात आरोपीने पीडितेची किंवा मुलांची काळजी न घेतल्यास त्याआधारे पुढील कारवाई केली जाईल, असेही न्यायालयाने निकाल देताना सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या :-
शरद पवारांविरुद्ध होणाऱ्या आक्षेपार्ह ट्वीटची मालिका संपेना; केतकी चितळेच्या पोस्ट नंतर ‘हे’ ट्विट तुफान व्हायरल
केतकी चितळेची ‘ती’ पोस्ट, राजकीय वर्तुळात खळबळ अन् थेट गुन्हा दाखल, वाचा संपूर्ण प्रकरण
एकनाथ शिंदे पुन्हा एकदा झाले ‘आनंद दिघें’चे सारथी; बुलेटवरचे फोटो तुफान व्हायरल

ताज्या बातम्या इतर

Join WhatsApp

Join Now