जेव्हा करोडो कमावणाऱ्या रजनीकांतला भीक म्हणून १० रूपये मिळतात, तेव्हा काय होते बघा..

सुपरस्टार रजनीकांत यांना आज संपूर्ण जगभरात ओळखले जाते. जगभरात रजनीकांत यांचे चाहते आहेत. त्यांच्या दर्जेदार अभिनयाने अनेकांना वेड लावले आहे. त्यांच्या दमदार आवाज आणि प्रभावशाली अभिनय अनेकांना प्रेरणा देतो.

एवढेचं नाही तर रजनीकांत यांचे चाहते त्यांना देव मानून त्यांची पुजा करतात. साऊथ फिल्म फिल्म इंडस्ट्रीमध्ये त्यांना देवा प्रमाणे मानतात. त्यांचा प्रत्येक चित्रपट त्यांच्या चाहत्यांसाठी प्रसादाप्रमाणे असतो.

रजनीकांत त्यांच्या चित्रपटांमूळेच नाही तर त्यांच्या स्वाभावामूळे देखील त्यांचे लाखो चाहते आहेत. रजनीकांत त्यांच्याकडे असलेल्या पैशांमधून अनेक लोकांची मदत करत असतात. त्यासोबतच त्यांच्या अनेक संस्था समाजसेवेचे काम करत असतात.

त्यांच्या या सर्व कामांमुळेचं लोक त्यांना देव मानतात. पण एकदा एका महिलेने रजनीकांत यांना भिकारी समजून भीक दिली होती. त्यावेळी रजनीकांत यांनी अतिशय प्रेमाने त्या पैशांचा स्वीकार केला होता.

तुम्हाला प्रश्न पडला असेल ना, सुपरस्टार रजनीकांतला कोणी भिकारी कसे समजू शकते? पण ही गोष्ट खरी आहे. चला तर मग जाणून घेऊयात नक्की काय आहे हा किस्सा.

हा किस्सा आहे २००७ सालचा. २००७ मध्ये रजनीकांत यांचा ‘शिवाजी द बॉस’ हा चित्रपट रिलीज झाला होता. हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर सुपरहिट झाला होता. त्यामूळे रजनीकांत यांनी हा चित्रपट हिट केल्याबद्दल त्यांच्या सर्व चाहत्यांचे आभार मानले.

चित्रपट हिट झाल्यामुळे रजनीकांत यांनी मंदिरात जाऊन दर्शन घ्यायचा निर्णय घेतला. पण या मंदिरात जातात त्यांनी सामान्य माणसांप्रमाणे वेशभूषा केली होती. त्यामूळे त्यांना ओळखणे थोडे कठीण होते.

मेकअप केल्यामुळे रजनीकांत यांना ओळखणे खुप कठीण झाले होते. मंदिरात गेल्यानंतर रजनीकांत मंदिराच्या पायऱ्यांवर बसले होते. त्यावेळी एका महिलेने त्यांना भिकारी समजून दहा रुपयांची नोट दिली. रजनीकांत यांनी अतिशय प्रेमाने त्या पैशांचा स्वीकार केला आणि ते पैसे पाकिटात ठेवून दिले.

पण थोड्या वेळाने लोकांनी रजनीकांत यांना ओळखण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्या महिलेला समजले की, आपण सुपरस्टार रजनीकांत यांना भिकारी समजून पैसे दिले. त्या महिलेने रजनीकांत यांची माफी मागितली आणि पैसे परत मागितले.

त्यावेळी रजनीकांत यांनी त्या महिलेला सांगितले की, मी तुमचे पैसे परत देणार नाही. ते माझ्यासाठी तुमच्या आशिर्वादाप्रमाणे आहेत’. रजनीकांतचे हे बोलणे ऐकून त्या महिलेच्या डोळ्यात पाणी आले.

त्यावेळी लोकांना समजले की, सुपरस्टार रजनीकांत यांचे स्टारडमचं नाही तर त्यांचे मन देखील खुप मोठे आहे. करोडोच्या संपत्तीचे मालिक असणारे रजनीकांत मनाने देखील सुपरस्टार आहेत. म्हणून लोक त्यांना देवप्रमाणे मानतात आणि त्यांची पूजा करतात.

महत्वाच्या बातम्या –

दिशावर झालेल्या सामूहिक बलात्काराचे सत्य सुशांतला जाणून घ्यायचे होते; हत्येचाही संशय होता

रोहीत, पार्थनंतर पवारांच्या तिसऱ्या पिढीतील तिसरं नातवंडही राजकारणात

…म्हणून डाॅक्टर सांगतात आईचे दुध न मिळू शकणाऱ्या बाळाला पाजावे बकरीचे दुध

बर्थडे स्पेशल! पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी घेतलेले धडाकेबाज निर्णय; वाचा सविस्तर

जाणून घ्या; डॉ.अमोल कोल्हे यांनी वैद्यकीय शिक्षण घेतल्यानंतर अभिनय क्षेत्रात कसा प्रवेश केला

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.