चेन्नई । संपूर्ण जगाचे लक्ष लागलेल्या रजनीकांत यांच्या राजकारणातील प्रवेशाला अखेर सुरुवात होणार आहे. रजनीकांत यांनी याबाबत घोषणा केली आहे. यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये एक आंनदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दक्षिणेतील सुपरस्टार रजनीकांत यांनी अखेर सक्रिय राजकारणात उतरण्याची अधिकृतरीत्या घोषणा केली आहे. रजनीकांत यांनी आज एक ट्विट करत ही घोषणा केली आहे. मी जानेवारीमध्ये नव्या पक्षाची स्थापना करणार असून, त्याची घोषणा ३१ डिसेंबर रोजी करण्यात येईल, असे रजनीकांत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
गेल्या काही दिवसांपासून रजनीकांत राजकारण येणार असल्याची चर्चा होती. यामुळे राज्यात आता राजकीय वातावरण तापू लागले आहे. पुढील वर्षी तामिळनाडूमध्ये एप्रिल-मे महिन्यादरम्यान विधानसभेची निवडणूक होणार आहे.
रजनीकांत हे गेल्या दोन वर्षांपासून तामिळनाडूमधील राजकीय मुद्द्यांवर सक्रिय झालेले आहेत. राज्यात चर्चा होत असल्या तर आतापर्यंत त्यांनी राजकारणामध्ये अधिकृतरीत्या प्रवेश केलेला नव्हता. याबाबत अनेकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता.
गेल्या वर्षी दक्षिणेतील सुपरस्टार कमल हसन यांनी रजनीकांत यांच्यासोबत मिळून काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर दोघांच्याही पक्षात आघाडी होण्याचे वृत्त समोर आले होते. आता निवडणुकीच्या तोंडावर राज्यात मोठ्या घडामोडी होताना दिसत आहेत.