लग्न करण्या अगोदर एक वर्ष लिव्हिन इनमध्ये राहावे लागेल; सुपरस्टारच्या सासूने ठेवली होती अट

सध्या अक्षय कुमार बॉलीवूडमध्ये त्याच्या लक्ष्मी चित्रपटामूळे खुप चर्चेत आहे. या चित्रपटासाठी अक्षयने खुप जास्त मेहनत घेतली होती. या चित्रपटाच्या रिलीजनंतर प्रेक्षकांनी देखील या चित्रपटाला चांगलाच प्रतिसाद दिला आहे.

सध्या अक्षय कुमार यशाच्या शिखरावर आहे. कारण त्याचे सगळे चित्रपट सुपरहिट होत आहेत. लोकांना त्याचे काम खुप जास्त आवडत आहे. पण एक काळ असा होता. जेव्हा अक्षय त्याच्या चित्रपटांमूळे नाही तर त्याच्या अफेअरमूळे चर्चेत असायचा. रोज नवीन अभिनेत्रीसोबत त्याचे नाव जोडले जायचे.

पण आज मात्र तो फॅमिली मॅन आहे. अक्षयने राजेश खन्नाची मुलगी ट्विंंकलसोबत लग्न केले आहे. लग्नाच्या अगोदर हे दोघे रिलेशनशिपमध्ये होते. एवढेच नाही तर एक वर्ष लिव्हिंग इनमध्ये देखील राहिले. त्यानंतर या दोघांनी लग्न केले. एवढ्या वर्षांनंतरही हे दोघे सुखाचा संसार करत आहे.

अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्नाच्या लव्ह स्टोरीबद्दल खुप कमी लोकांना माहीती आहे. आज आम्ही तुम्हाला या दोघांच्या लव्ह स्टोरीबद्दल सांगणार आहोत. या दोघांची भेट एका चित्रपटाच्या सेटवर झाली होती. त्यावेळी हे दोघेही दुसऱ्या व्यक्तींसोबत रिलेशनशिपमध्ये होते.

पण शुटिंग पुर्ण होईपर्यंत या दोघांचे ब्रेकअप झाले. त्यानंतर अक्षयने ट्विंकलला प्रोपोज केले. त्यावेळी ट्विंकलने अक्षयला होकार दिला होता. पण तिने हे नाते फक्त टाईमपास म्हणून बनवले होते. तिने अक्षयसोबत लग्न करण्याचा विचार केला नव्हता.

अक्षयने ट्विंकला लग्नासाठी अनेक वेळा प्रोपोज केले. तिने नकार दिला. शेवटी अक्षयने ट्विंकलला लग्नासाठी मागणी घातली. तेव्हा ट्विंकल ‘मेला’ चित्रपटाची शुटिंग करत होती. तिने अक्षयला सांगितले की, ‘हा चित्रपट फ्लॉप झाला तर मी तुझ्याशी लग्न करेल आणि हिट झाला तर माझ्या करिअरवर लक्ष देईल’.

मेला चित्रपट फ्लॉप झाला आणि या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. ट्विंकलने ही गोष्ट आई डिंपल ला सांगितली. त्यावेळी डिंपल कपाडियाने अक्षय आणि ट्विंकलसमोर लग्न करण्यासाठी एक अट ठेवली होती. दोघांनी ती अट पुर्ण केली. तरच त्यांचे लग्न होईल.

डिंपल कपाडियाने अट ठेवली होती की, अक्षय आणि ट्विंकलला लग्नाच्या अगोदर एक वर्ष लिव्हिन इन रिलेशनशिपमध्ये राहावे लागेल. दोघांमध्ये एक वर्ष सगळं काही नीट राहिले. भांडण झाले नाहीत. तरच ते दोघे लग्न करू शकतात.

दोघांनी ही अट मान्य केली. दोघांमध्ये सगळं काही नीट राहिले. म्हणून त्या दोघांनी लग्न केले. लग्नानंतर त्या दोघांना मुलगा झाला. २०१२ मध्ये ट्विंकलने त्यांच्या मुलीला जन्म दिला. पण मुलीच्या जन्मा अगोदर ट्विंकलने अक्षयसमोर एक अट ठेवली होती.

त्यावेळी अक्षय कुमारचे करिअर खुप वाईट सुरू होते. त्याचे अनेक चित्रपट फ्लॉप झाले होते. म्हणून तो खुप टेन्शनमध्ये होता. ट्विंकलने अक्षयला सांगितले की जर अक्षयने चांगले चित्रपट केले. तरच ती दुसऱ्या बाळाला जन्म देईल. नाहीतर ती दुसऱ्यांदा आई होणार नाही.

ट्विंकलची ही अट अक्षयने मान्य केली. त्यानंतर त्याने त्याच्या चित्रपटांच्या स्क्रिप्टकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. तो चांगल्या चित्रपटांची निवड करू लागला. ट्विंकलमूळे अक्षय कुमारचे बॉलीवूडमध्ये कमबॅक झाले. नाही तो फ्लॉप झाला होता.

महत्त्वाच्या बातम्या –

पहिल्या चित्रपटामध्ये असे काय झाले की, सलमान खानने घेतला एवढा मोठा निर्णय

फक्त पाचशे रुपये घेऊन मुंबईला आली होती ‘ही’ अभिनेत्री आज कमावते करोडो रुपये

पुजा भट्टच्या वाईट सवयींमूळे आजपर्यंत सलमान खानने तिच्यासोबत कधीही काम केले नाही

…म्हणून सलमान खानने आजपर्यंत कोणत्याही चित्रपटामध्ये किसिंग सीन दिला नाही

साऊथच्या अभिनेत्रीच्या प्रेमात पागल झाले होते कपिल देव; केली होती लग्नाची तयारी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.