ब्रेकिंग! सुपरस्टार अभिनेते विवेक यांचे निधन, सिनेसृष्टीला मोठा धक्का

मुंबई । सिनेसृष्टीतून एक दुःखद बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेते विवेक यांचे वयाच्या ५९व्या वर्षी दुःखद निधन झाले आहे. त्यांना कार्डिअ‍ॅक अरेस्टचा अटॅक आला. निधनाचे वृत्त समजताच सर्वांना एकच धक्का बसला. विवेक हे तमिळ सिनेसृष्टीतील सुपरस्टार अभिनेते म्हणून ओळखले जायचे.

त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान त्यांना मृत घोषित करण्यात आले. सेलिब्रिटी आणि चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले होते.

रजनीकांत यांच्या शिवाजी द बॉस या चित्रपटामुळे त्यांना वेगळी ओळख मिळाली होती. यामुळे त्यांना बॉलीवूड चाहते देखील फॉलो करु लागले होते. सुरुवातीला उदरनिर्वाह करण्यासाठी ते बॅकस्टेज आर्टिस्ट म्हणून काम करु लागले.

त्यांना दरम्यान १९८७ साली मन्नाथी उर्थी वेंडम या चित्रपटात काम करण्याची संधी त्यांना मिळाली. हा चित्रपट गाजला नाही, मात्र विवेक यांच्या अभिनयाचे कौतुक सर्वांनीच केले. यानंतर त्यांनी अनेक चित्रपट केले.

पुढे त्यांनी त्यांनी अबु सांगिर, केलादी कम्मानी, तंबी पोंटाडी, तमिळ पोन्नू यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले. यामुळे ते खऱ्या अर्थाने जगासमोर आले. विवेक यांचा जन्म तमिळनाडूतील एका गरीब कुटुंबात झाला होता. लहानपणापासूनच त्यांना अभिनयाची आवड होती.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.