मुंबई | सध्या सुरू असलेले सण, उत्सवानंतर जानेवारी पश्चात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता आरोग्य विभागाने वर्तविली आहे. यात व्यवसायानिमित्ताने ज्या व्यक्तींचा अधिक जनसंपर्क किंवा सामाजिक संपर्क आहे, अशा सुपर स्प्रेडर व्यक्तींमुळे संसर्ग वाढण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले आहे.
याचे कारण असे की, मुंबई महापालिकेने केलेल्या मास टेस्टिंग अंतर्गत गर्दीशी संपर्क आलेल्या तब्बल १५० जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. यामध्ये विक्रेते, व्यावसायिक, बस चालक-वाहक यांचा समावेश आहे. यामुळे आता अधिकच भीतीचे वातावरण पसरले आहे.
मुंबई महापालिकेने १५ नोव्हेंबरपासून मास टेस्टिंग मोहीम हाती घेतली होती. ज्या लोकांचा गर्दीशी सातत्याने संपर्क येतो, त्यांची टेस्टिंग या मोहिमेअंतर्गत करण्यात आली. यामध्ये दुकानदार, फेरीवाले, वेगवेगळ्या ठिकाणचे व्यावसायिक, बाजारातील विक्रेते यांची कोरोना चाचणी करण्यात आली.
वाचा सुपर स्प्रेडर कोण…
किराणा दुकानदार, भाजीवाले, हॉकर्स, हॉटेल मालक व वेटर्स, घरगुती काम करणाऱ्या मोलकरणी, नळजोडणी, दुरुस्ती लॉन्ड्री, पुरोहित, मालवाहतूक करणारे ट्रक ड्रायव्हर्स, टेम्पोचालक, रिक्षाचालक, हमाली, रंगकाम, बांधकाम करणारे मजूर, ड्रायव्हर कंडक्टर, सुरक्षारक्षक, पोलीस, होमगार्ड इ.
महत्त्वाच्या बातम्या
काही महिन्यांत भारतीयांना मिळणार प्रभावी कोरोना लस; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडून माहिती
चिंतेत भर! करोनाच्या लक्षणांमध्ये बदल; नाकावाटे करू शकतो मेंदूत शिरकाव; नवा निष्कर्ष
प्रताप सरनाईकांचा क्वारंटाईन कालावधी संपला; गुरुवारी ईडीसमोर हजर होणार?