Super Four : सुपर फोरमधील पहिल्या सामन्यात पाकिस्तानकडून पराभूत झाल्यानंतर भारताचा आज श्रीलंकेशी सामना झाला. दुबई येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम मध्ये झालेल्या या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीला आमंत्रीत करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी प्रथम फलंदाजी करताना भारताने 8 गड्यांच्या मोबदल्यात 173 धावा केल्या.(Super Four, Pakistan, Sri Lanka, Dubai, International Cricket Stadium, Team India, Rohit Sharma)
अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात श्रीलंकेने भारताला पराभूत केले. श्रीलंकेने 19.5 षटकांत 4 गडी गमावून 174 धावा केल्या आणि सामना 6 गडी राखून जिंकला. या पराभवानंतर टीम इंडिया अंतिम फेरीच्या शर्यतीतून जवळपास बाहेर पडली आहे. अंतिम फेरी गाठण्यासाठी भारतीय संघाला आता केवळ अफगाणिस्तानला पराभूत करून भागणार नाही. त्यासोबतच तर श्रीलंका आणि अफगाणिस्तानने पाकिस्तानला पराभूत करावे यासाठीहीही प्रार्थना करावी लागेल.
नाणेफेक हरल्यानंतर कर्णधार रोहीत शर्माने कप्तानी खेळी करत अर्धशतक झळकावले. तरीही भारतीय संघाची सुरुवात खूपच खराब झाली. दुसऱ्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर सलामीवीर केएल राहुल पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने 7 चेंडूत 6 धावा केल्या. यानंतर फलंदाजीला आलेल्या विराट कोहलीला काही विशेष करता आले नाही.
विराट कोहलीने 4 चेंडूंचा सामना केला आणि त्याला खातेही उघडता आले नाही. यानंतर रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी 97 धावांची भागीदारी झाली. 13व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर कर्णधार रोहित शर्मा 41 चेंडूत 72 धावा करून बाद झाला. 15व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर मधुशंकाने 3 विकेट घेत भारताला चौथा धक्का दिला. इथेच भारताची अवस्था संकट झाली होती.
29 चेंडूत 34 धावा करून सूर्यकुमार यादव देखील झेलबाद झाला. 18व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर हार्दिक पांड्याची विकेट पडली. पांड्याने 13 चेंडूत 17 धावा केल्या. यानंतर यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने 13 चेंडूत 17, दीपक हुडाने 3 धावा केल्या. अंतिम क्षणी फटकेबाजी करण्यासाठी भारताकडे एकही मोठा फलंदाज उरला नाही.
आर अश्विन 17 चेंडूत 15 धावा करून नाबाद राहिला आणि अर्शदीप सिंगने 1 धाव काढली. श्रीलंकेकडून दिलशान मदुशंकाने 3, चमिका करुणारत्ने-दासून शनाकाने 2-2 आणि महेश टीक्षानाने 1 बळी घेतला.
दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन:
भारत: राहुल, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), दीपक हुडा, हार्दिक पंड्या, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग.
श्रीलंका: पाथुम निसांका, कुसल मेंडिस, चरित अस्लंका, दानुष्का गुनाथिलका, दासुन शनाका (कर्णधार), भानुका राजपक्षे, वनिंदू हसरंगा, चमिका करुणारत्ने, महेश तिक्षना, असिथा फर्नांडो, दिलशान मधुशंका.
महत्वाच्या बातम्या
‘गुलाबराव पाटलांची गोधडी काढल्याशिवाय राहणार नाही’; चंद्रकांत खैरेंना राग अनावर
‘शिवसेना -मनसे एकत्र येण्याचे बाळासाहेबांचे भाकीत सत्यात उतरत असेल तर…’ शिंदे गटाकडून युतीचे संकेत
‘भाजपला पाठिंबा देतो, पण मुंबईचा महापौर आरपीआयचा करा’- रामदास आठवले