वडील सावत्र आईचं नाव काढत नाही; तर दुसरीकडे नातू कौतूक करता करता थांबत नाही

फिल्म इंडस्ट्रीतील सदाबाहार अभिनेत्रींमध्ये हेमा मालिनीचे नाव देखील येते. वयाची सत्तरी पार केली तरी हेमा मालिनी आजही खुप फिट आणि सुंदर दिसतात. त्यांच्याकडे बघून त्यांच्या वयाचा अंदाज लावता येत नाही. त्यामूळे आजही त्यांचा चाहता वर्ग कमी झालेला नाही.

हेमा मालिनीच्या वैयक्तिक आयूष्याबद्दल बोलायचे झाले तर त्यांनी अभिनेता धर्मेंद्रसोबत लग्न केले. त्यांच्या प्रेम प्रकरणाबद्दल आपल्या सर्वांना माहितीच आहे. १९७९ साली या दोघांनी शराफत आणि तुम हसी मै जवा या दोन चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते. त्यानंतर या दोघांमध्ये जवळीक वाढायला लागली. त्यांची मैत्री वाढत होती. या दोघांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.

दोघांनी त्यांच्या नात्याबद्दल घरी सांगितले. पण धर्मेंद्र आगोदरपासूनच विवाहीत होते. या लग्नापासून धर्मेंद्रला मुले देखील होती. त्यामूळे हेमा मालिनीच्या घरच्यांना हे लग्न मान्य नव्हते. हेमाच्या आईंचा या लग्नाला नकार होता. पण हेमा मात्र धर्मेंद्रच्या प्रेमात पागल झाल्या होत्या.

शेवटी धर्मेंद्र आणि हेमा मालिनीने धर्म बदलून विवाह केला होता. कारण हिंदू धर्मात एकाच लग्नाला मान्यता आहे. त्यामुळे त्यांनी हिंदू धर्म बदलून मुस्लिम धर्म स्वीकारून हेमा मालिनीशी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

याच कारणामूळे देओल कुटूंब हेमा मालिनीवर चिडले होते. आजही दोन्ही कुटूंबामध्ये चांगले संबंध नाहीत. धर्मेंद्रच्या पहील्या पत्नीने हेमाचा स्वीकार केला नाही. त्यामूळे त्यांची मुलं सनी आणि बॉबी देओलही हेमा मालिनीला खास पसंत करत नाहीत.

एवढ्या वर्षांनंतरही सनी देओल हेमाला आई मानत नाही. त्यांच्याबद्दल काहीही बोलणे टाळतो. पण सनी देओलचा मुलगा करण देओल मात्र हेमा मालिनीला खुप मानतो. त्याने सांगितले की, हेमा मालिनीचा अभिनय खुपच उत्तम आहे. तो त्यांचा फॅन आहे.

करण देओलने ‘पल पल दिल के पास’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये डेब्यू केला आहे. अभिनयात येणारी ही देओल कुटूंबातील तिसरी पिढी आहे. करणला एका मुलाखतीमध्ये हेमा मालिनीबद्दल प्रश्न विचारण्यात आले. ज्यावर त्याने खुप चांगले उत्तर दिले आहेत.

करण देओल म्हणाला की, ‘त्याने हेमा मालिनीचे अनेक चित्रपट पाहीले आहेत. त्यांचा अभिनय खरच खुप उत्तम आहे. पहील्या चित्रपटापासून शेवटच्या चित्रपटापर्यंत त्यांचे करिअर शानदार होत. ज्यामूळे माझ्या त्या आवडत्या अभिनेत्री बनल्या आहेत. मी त्यांचे चित्रपट पाहत असतो’.

करणला ज्यावेळी त्याच्या आणि हेमा मालिनीच्या नात्याबद्दल विचारण्यात आले. त्यावेळी त्याने उत्तर देणे टाळले. पण त्याने सांगितले की, हेमा जेवढ्य चांगल्या अभिनेत्री आहेत. तेवढ्या चांगल्या व्यक्ति देखील आहेत.
महत्वाच्या बातम्या –
रणबीर कपूरसाठी कतरिनाने फक्त एक मेसेज करुन सलमान खानसोबत केले ब्रेकअप
जुन्या आठवणींना उजाळा देत सचिन पिळगावकर यांनी शेअर केला लक्ष्यासोबतचा ‘तो’ फोटो
मला तुझ्या कोणत्याही पार्टमध्ये इंट्रेस्ट नाही असे सांगत या अभिनेत्रीला करण जोहरने लग्नासाठी दिला नकार

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.