..म्हणून सनी देओलने ‘डर’ चित्रपटाच्या सेटवर सामान उचलून फेकले होते

बॉलीवूडच्या चित्रपटांमध्ये अभिनेते सनी देओलचा राग तर सगळ्यांनीच बघितला आहे. पण खऱ्या आयूष्यात खुप कमी लोकांनी सनी देओलला रागात बघितले असेल.

असाच एक किस्सा आहे १९९३ साली आलेल्या ‘डर’ चित्रपटाचा. डर चित्रपटाच्या सेटवर सनी देओल आणि शाहरुख खानमध्ये खुप मोठे भांडण झाले होते. त्यानंतर सनी देओलने सोळा वर्ष शाहरुख खानसोबत काम केले नाही.

चला तर मग जाणून घेऊया नक्की काय आहे हा किस्सा

सनी देओल ९० च्या दशकामध्ये सुपरस्टार झाले होते. कारण त्यांचा &परस्टार झाले होते. कारण त्यांचा ‘दामिनी’ चित्रपट सुपरहिट झाला होता. त्यामूळे अनेक दिग्दर्शकांना आणि निर्मात्यांना त्यांच्यासोबत काम करायचे होते.

याच कालावधीत यश चोप्रा डर चित्रपट बनवत होते. त्यांनी या चित्रपटासाठी सनी देओलला ऑफर दिली आणि त्यांच्यासमोर खलनायक आणि हिरो हे दोन्ही ऑप्शन ठेवले आणि सनी देओलने हिरोच्या भुमिकेची निवड केली.

त्यानंतर नकारात्मक भुमिकेसाठी यश चोप्राने अजय देवगन आणि आमिर खानला ऑफर दिली. पण त्या दोघांनी या भुमिकेसाठी नकार दिला. त्यानंतर ही भूमिका शाहरुख खानकडे गेली.

या चित्रपटाची शुटींग सुरु झाली होती. या चित्रपटामध्ये शाहरुख खान आणि सनी देओलमध्ये एक फाईट सीन होता. या सीनमध्ये शाहरुख खान सनी देओलला समोरुन येऊन चाकू मारतो. पण सनी देओलला हा सीन आवडला नाही.

कारण चित्रपटामध्ये सनी देओल कमांडर होते.
त्यांनी ही गोष्ट यश चोप्राला सांगितली, ‘ते म्हणाले की, मी कमांडर आहे. त्यामूळे मला समोरुन चाकू मारने शक्य नाही. हा मला मागून चाकू मारेल तर ते ठिक आहे.’ पण ही गोष्ट यश चोप्राने मान्य केली नाही.

त्यांनी त्या सीनमध्ये काहीही बदल केले नाहीत.
याच गोष्टीवरुन सनी देओल आणि यश चोप्रामध्ये भांडण झाली. सनी देओलने सेटवर असणारे सामान उचलून फेकले होते. त्यानंतर शाहरुख खानसोबत देखील त्यांचे भांडण झाले.

त्यासोबतच या चित्रपटामध्ये शाहरुख खान नकारात्मक भूमिकेत होता. पण तरीही त्याला जास्त प्रसिद्धी मिळाली होती. त्यामूळे तो शाहरुख खानला दुश्मन समजू लागला.

याच गोष्टीमुळे सनी देओलने यानंतर यश चोप्रा आणि शाहरुख खानसोबत काम न करण्याचा निर्णय घेतला.
पण २००९ मध्ये शाहरुख खान आणि सनी देओलचे भांडण संपले आणि ते चांगले मित्र झाले.

हे ही वाचा –

वयाच्या अवघ्या तिसऱ्या वर्षी टिव्हीवर काॅमेडी शो करणारी गंगुबाई आता काय करतीय पहा

हेमामालिनीने एक चुगलीमुळे धर्मेंद्रने गोविंदाच्या कानाखाली वाजवली होती; जाणून घ्या पुर्ण किस्सा..

म्हणून शक्तीमान मुकेश खन्नांनी अजूनही नाही केले लग्न! सांगीतले धक्कादायक कारण

एखाद्या चित्रपटाच्या फिल्मी स्टोरीप्रमाणे ‘या’ अभिनेत्याचे कुटुंब एका रात्रीत संपले

भोळ्या भाबड्या दयाभाभीने ‘बी’ ग्रेड चित्रपटांमध्येही काम केले आहे; सीन पहाल तर शाॅक व्हाल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.