सनी देओलने ज्या अभिनेत्याची धुलाई केली होती; शेवटी त्याच अभिनेत्याच्या लग्नाच्या पत्रिका स्वत: वाटल्या

फिल्म इंडस्ट्रीमध्ये कधी कोणत्या कलाकाराचे नातं बदलेले काही सांगता येत नाही. काही सेकंदात कलाकारांधली नातं बदलून जातात आणि कोणीही काहीही करु शकत नाही. म्हणून बॉलीवूडमध्ये अनेक वेळा वादाचे वातावरण तयार होते.

असेच काही वाद अभिनेता सनी देओल आणि अक्षय कुमारमध्ये झाले होते. एका अभिनेत्रीमूळे दोघांची भांडणं झाली होती. त्या अभिनेत्रीचे नाव आहे रविना टंडन. रविनामूळे अक्षय आणि सनीमध्ये वाद झाले होते.

सनी देओल आणि रविना टंडन एका चित्रपटामध्ये एकत्र काम करत होते. या चित्रपटाच्या सेटवर रवीना खुप उदास असायची. ती शांत बूसन असायची किंवा अनेक वेळा ती रडत बसायची. या गोष्टीमूळे त्या चित्रपटावर परिणाम होत होता. जी गोष्ट सनीला आवडत नव्हती.

सनीने तिला या मागचे कारण विचारले. त्यावेळी ती म्हणाली की, मला अक्षय कुमारने फसवले आहे. त्याने माझ्यासोबत प्रेमाचे नाटकं केले आणि काही दिवसांनी ब्रेकअप केले. आज दुसऱ्या अभिनेत्रीला डेट करत आहे. जी गोष्ट मला आवडत नाही.

हे ऐकल्यानंतर सनी खुप चिडला. त्याने अक्षयला भेटायला बोलावले. या दोघांची भेट झाल्यानंतर दोघांमध्ये खुप मोठे भांडण झाले. सनीने अक्षयवर हात उचलला. हा वाद खुप वाढला होता. शेवटी रविनाने या दोघांचे भांडण थांबवले. नाहीतर ही गोष्ट खुप जास्त वाढली असती.

या भांडणामूळे अक्षय आणि सनी एकमेकांशी बोलत नव्हते. पण काही वर्षांनी सनीने स्वत अक्षय आणि ट्विंकलच्या लग्नाच्या पत्रिका वाटल्या होत्या. कारण सनी आणि अक्षयची सासू डिंपल अनेक वर्ष रिलेशनशिपमध्ये होते.

ज्यावेळी ट्विंकल आणि अक्षयने लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी सनीने या लग्नाला नकार दिला होता. त्याला वाटत होते. की, अक्षय दुसऱ्या अभिनेत्रींप्रमाणे ट्विंकला देखील सोडून देईल. पण डिंपलच्या सांगण्यावरुन तो या लग्नासाठी तयार झाला. दोघांनी लग्नाच्या पत्रिकांचे वाटप केले होते.

महत्वाच्या बातम्या –

४२ वर्षांची असूनही अविवाहीत आहे शिल्पा शेट्टीची बहीण शमिता; ‘ह्या’ एका चुकीमूळे करिअर झाले होते खराब

अमृता सिंगसोबत झालेल्या घटस्फोटाची आठवण काढून रडला सैफ; म्हणाला, माझ्यासाठी सर्वात कठिण…

वाचा पद्मिनी कोल्हापूर आणि राजीव कपूरची हटके लव्ह स्टोरी; ‘या’ व्यक्तिमूळे पद्मिनी कोल्हापूरे कपूर घराण्याची सुन होऊ शकल्या नाहीत

‘फॅन्ड्री’ चित्रपटातील जब्याचा नवीन लुक पाहून तुम्ही त्याला ओळखू शकणार नाही

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.