त्या दिवशी सनी देओल महेश भट्टला म्हणाला की, तुम्ही फक्त नावाला दिग्दर्शक आहात

बॉलीवूडचे काही अभिनेते खुप प्रसिध्द आहेत. चित्रपटांमध्ये प्रसिद्ध अभिनेत्याचे नाव असेल तर तो चित्रपट लगेच हिट होतो. अभिनेत्याच्या नावानेच चित्रपट करोडोची कमाई करतात. असेच एक नाव म्हणजे सनी देओल.

सनी देओल आत्ता चित्रपटांपासून लांब आहेत. पण ८० आणि ९० च्या दशकात बॉलीवूडमध्ये सनी देओलचे राज्य होते. सनी देओलच्या नावाने चित्रपट हिट व्हायचे. एखाद्या चित्रपटामध्ये सनी देओल असेल तर मग तो चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट व्हायचा.

त्यामुळे अनेक दिग्दर्शक सनी देओलसोबत काम करायला तयार असायचे. घायल, घातक, दामिनी यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये त्याने काम केले आहे. सनीने बॉलीवूडच्या मोठ्या मोठ्या दिग्दर्शकांसोबत काम केले आहे. सनीने एकाच दिग्दर्शकासोबत अनेकदा काम केले आहे.

पण बॉलीवूडचा एक दिग्दर्शक असा आहे ज्याच्यासोबत सनी देओलने फक्त एकदाच काम केले आहे. त्याने परत कधीच त्या दिग्दर्शकासोबत काम केले नाही. एवढेच नाही तर सनी देओलला त्या दिग्दर्शकाचा चेहरा बघायला देखील आवडत नाही.

या दिग्दर्शकाचे नाव आहे महेश भट्ट. ८० आणि ९० च्या दशकात बॉलीवूडमध्ये महेश भट्टच्या नावाचा बोलबाला होता. महेश भट्टला बॉलीवूडच्या सर्वात यशस्वी दिग्दर्शकांपैकी एक समजले जाते. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करण्यासाठी अनेक अभिनेते तयार असायचे.

ज्यावेळी महेश भट्टने सनी देओलला चित्रपटाची ऑफर दिली. त्यावेळी सनीला खुप आनंद झाला होता. कारण महेश भट्ट हे नाव त्या काळी खुप प्रसिद्ध होते. त्यांनी अनेक हिट चित्रपट दिले होते. म्हणून सनीने देखील या चित्रपटाला होकार दिला.

या चित्रपटाचे नाव होते ‘गुनाह’. या चित्रपटासाठी सनीने होकार दिला होता. या चित्रपटात डिंपल कपाडिया, सुमित सैगल आणि राज मुराद यांसारखे अभिनेते महत्त्वाच्या भुमिकेत होते. या चित्रपटाची सगळी तयारी झाली होती.

चित्रपटाच्या शुटिंगचा पहिला दिवस होता. सनी देओल चित्रपटाच्या सेटवर पोहोचला होता. सगळं कलाकार आले होते. पण चित्रपटाचे दिग्दर्शक महेश भट्ट मात्र आले नव्हते. त्यामुळे सनी देओलला थोडे विचित्र वाटले. पण त्याने लक्ष दिले नाही.

पहिल्या दिवशी चित्रपटाच्या सहाय्यक दिग्दर्शकाने सगळे काही सांभाळले. दुसऱ्या दिवशी देखील सहाय्यक दिग्दर्शकानेच चित्रपटाचे दिग्दर्शन केले. असे खुप दिवस सुरू होते. त्यानंतर एक दिवस महेश भट्ट सेटवर आले आणि चित्रपटातील सर्व कलाकारांना भेटले.

चित्रपटाच्या पोस्टरवर सगळीकडे मुख्य दिग्दर्शक म्हणून महेश भट्टचे नाव होते. चित्रपटाची सगळी शुटिंग पूर्ण होत आली होती. पण महेश भट्टने एकाही सीनचे दिग्दर्शन केले नाही. त्यामुळे सनी देओलला खुप राग आला होता.

शेवटी सनी महेश भट्टकडे गेला. तो महेशला म्हणाला की, ‘तुम्ही या चित्रपटाचे दिग्दर्शक फक्त नावाला आहात. कारण सगळे दिग्दर्शन तुमच्या सहाय्यकाने केले आहे. तुम्ही काही काम केले नाही’. या गोष्टीवरून दोघांमध्ये खुप वेळ वाद झाला.

सनी देओल आणि महेश भट्टमध्ये वाद सुरू होता. तेव्हा पाच तास चित्रपटाचे शुटिंग थांबले होते. महेश भट्टने सनी देओलला सांगितले की, मी सध्या खुप व्यस्त आहे. माझ्या अनेक चित्रपटांच्या शुटिंग सुरू आहेत. त्यामुळे मला या चित्रपटाकडे लक्ष देता आले नाही’.

९० च्या दशकात महेश भट्ट त्यांच्या करिअरच्या टॉपवर होते. त्यामुळे ते अनेक चित्रपट करत होते. त्यासोबतच त्यांच्या होम प्रोडक्शनचे देखील काम सुरू होते. त्यांचे सगळे लक्ष त्यांच्या होम प्रोडक्शनमध्ये बनणाऱ्या चित्रपटांकडे होते.

त्यामुळे त्यांनी सनी देओलच्या चित्रपटाकडे दुर्लक्ष केले. म्हणून सनीला खुप राग आला होता. महेश भट्टने आपला अपमान केला आहे. असे त्याला वाटू लागले. त्याने गोष्टी बदला घेण्यासाठी परत कधीच महेश भट्टकडे काम न करण्याचा निर्णय घेतला.

एवढेच नाही तर सनी देओलला महेश भट्टचा चेहरा पाहणे देखील आवडत नाही. त्यामुळे सनी नेहमी महेश भट्टपासून लांब पळतो. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. पण महेश भट्ट आणि सनी देओलने परत कधीच एकत्र काम केले नाही.

महत्त्वाच्या बातम्या –

बाॅलीवूडच्या ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीने घातलाय सोन्याचा ड्रेस; किंमत ऐकल्यावर वेडे व्हाल..

सलमान खानसोबत काम करायला बॉलीवूडच्या ‘या’ अभिनेत्रीने दिला होता नकार

सिनेमा सुद्धा फिका पडेल इतकी नाट्यमय लव्हस्टोरी आहे स्मिता पाटील व राज बब्बरची

त्या दिवशी करण जोहरने मीडियासमोर गोविंदाची जाहीर माफी मागितली होती; असं काय घडलं होतं?

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.