..म्हणून सनी देओल आणि बॉबी देओलचे करिअर फ्लॉप झाले

प्रत्येक माणूस आयुष्यात काहीना ना काही चुका करत असतो. अनेक वेळा त्या चुकांमुळे आपलं नुकसान होते. पण तरीही आपण तशा चुका सारख्या सारख्या करत असतो.

या चुका फक्त सामान्य माणसं करतात असे नसते. अनेक बॉलीवूड कलाकारांनी त्यांच्या आयुष्यात मोठं मोठ्या चुका केल्या आहेत. त्या चुकांमूळे त्यांचे करिअर खराब झाले आहे.

जाणून घेऊया अशा कलाकारांबद्दल ज्यांच्या एका चुकीमूळे त्यांचे करिअर बरबाद झाले आहे.

१)भाग्यश्री – भाग्यश्रीने सलमान खानसोबत ‘मैने प्यार किया’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये डेब्यु केला होता. या चित्रपटानंतर भाग्यश्री रातोरात सुपरस्टार झाली होती तिला अनेक चित्रपटांच्या ऑफर येत होत्या. पण तिने त्या ऑफर स्वीकारल्या नाही.

रातोरात स्टार झाल्यानंतर भाग्यश्रीच्या एका चुकीमुळे तिचे करिअर खराब झाले. ती चुक म्हणजे भाग्यश्रीने चित्रपट रिलीज झाल्यानंतर काही दिवसांमध्येच लग्न केले. लग्नानंतर ती अभिनय क्षेत्रापासून लांब गेली.

२)बॉबी देओल – बॉबी देओल बॉलीवूडचे सुपरस्टार धर्मेंद्रचा मुलगा आहे. त्यामुळे त्याने बॉलीवूडमध्ये डेब्यु केला. बॉलीवूडमध्ये आल्यानंतर त्याने बरसात, चोर मचाये शोर, बादल, बिच्चू यांसारखे हिट चित्रपट केले.

या सर्व चित्रपटांमूळे तो स्टार झाला होता. पण त्याला हे स्टारडम सांभाळत आले नाही. काही दिवसांनी त्याने चित्रपटांच्या स्क्रिप्टकडे दुर्लक्ष करण्यास सुरुवात केली आणि अनेक फ्लॉप सिनेमे केले.

त्याच्या ह्या एका चुकीमुळे त्याचे करिअर खराब झाले. त्यामूळे तो गेले अनेक वर्ष अभिनय क्षेत्रापासून लांब होता. पण आत्ता बॉबी देओलने चित्रपटांमध्ये कमबॅक केले आहे.

३)प्रीती झिंटा – बॉलीवूडची डिंपल गर्ल म्हणून प्रीती झिंटाची ओळख होती. तिने अभिनय क्षेत्रात खुप दमदार डेब्यु केला होता. त्यामूळे ती खुप दिवसांमध्ये टॉपच्या अभिनेत्रींमध्ये सामील झाली होती.

करिअरच्या टॉपवर असताना प्रीती झिंटा प्रेमात पडली आणि हिच तिची चुक झाली. कारण प्रेमात पडल्यानंतर तिने करिअरकडे दुर्लक्ष करण्यास सुरुवात केली. त्यामूळे तिचे करिअर फ्लॉप झाले.

तिला या गोष्टीची जाणीव झाली. पण तोपर्यंत खुप उशीर झाला होता. बॉलीवूडमध्ये अनेक नवीन अभिनेत्री आल्या होत्या. त्यामूळे तिला बॉलीवूडमध्ये परत येता आले नाही.

४)सनी देओल – सनी देओल बॉबी देओलचा मोठा भाऊ आहे. त्याने त्याच्या करिअरची सुरुवात खुप हिट केली होती. पण त्याने या स्टारडमकडे लक्ष दिले नाही.

अनेक हिट चित्रपट केल्यानंतर तो अचानक थोडे दिवस बॉलीवूडमधून गायब झाला. पण जेव्हा तो परत आला त्यावेळी त्याला यश मिळाले नाही. त्यामूळे त्याचे करिअर फ्लॉप झाले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.