सुशांत प्रकरण! मुंबई पोलिसांवर ‘या’ व्यक्तीने केला गंभीर आरोप 

मुंबई | बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतचा १४ जूनला वांद्रेच्या राहत्या घरी मृतदेह आढळून आला होता. पोलिस तपासात सुशांतने आत्महत्या केल्याची म्हटले जात आहे, मात्र त्याने आत्महत्या का केली? हे अजून स्पष्ट झाले नाही.

तसेच सुशांत प्रकरणाचा तपास करत असताना दिशा सालियन प्रकरणाशी काही संबंध आहे का अशी पडताळणी देखील सुरु आहे. अशातच आता सुशांतचा मित्र सुनील शुक्ला याने दिशा प्रकरण सीबीआयकडे सोपवावी,अशी मागणी मुंबई उच्च न्यायालयात केली आहे.

याबाबत गुरुवारी सुनील शुक्ला याने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. यावेळी सुनील शुक्ला याने मुंबई उच्च न्यायालयानं दिशा प्रकरणी सीबीआयला चौकशी करण्याचे निर्देश द्यावेत, अशी विनंती केली आहे. तसेच यासंबंधित सुनीलने मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे.

दरम्यान, सुशांतच्या निधनाच्या पाच दिवस आधी दिशा सालियनने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली होती. याचप्रमाणे दिशा सालियनने काही काळ सुशांतसोबत काम केले होते. यामुळे सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाशी याचा काही संबंध आहे ? याचा तपास सुरु आहे.

मात्र या तपासावरच सुनीलनं गंभीर आरोप केला आहे. ‘मुंबई पोलिसांनी दिशा सालियनच्या मृत्यूचा तपास करताना अनेक बाबींचा विचार केलेला नसल्याचा गंभीर आरोप सुनीलने या याचिकेत केला आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे.

महत्त्वाच्या बातम्या
सुशांत केसमध्ये खळबळ; एनसीबीला वॉटर रिसॉर्टमध्ये सापडला महत्त्वाचा पुरावा
सुशांत प्रकरणातील ‘त्या’ मुद्द्यावर अखेर सलमान खानने सोडले मौन; म्हणाला..
मिथुन चक्रवर्ती यांच्या सुनेच्या पाठीमागे लागलंय भूत! सुनेने दिली माहिती

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.