सुशांत प्रकरणाला वेगळे वळण! ‘या’ व्यक्तीने मुंबई पोलिसांवर केला धक्कादायक आरोप

मुंबई | बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतचा १४ जूनला वांद्रेच्या राहत्या घरी मृतदेह आढळून आला होता. पोलिस तपासात सुशांतने आत्महत्या केल्याची म्हटले जात आहे, मात्र त्याने आत्महत्या का केली? हे अजून स्पष्ट झाले नाही.

तसेच सुशांत प्रकरणाचा तपास करत असताना दिशा सालियन प्रकरणाशी काही संबंध आहे का अशी पडताळणी देखील सुरु आहे. अशातच आता सुशांतचा मित्र सुनील शुक्ला याने दिशा प्रकरण सीबीआयकडे सोपवावी,अशी मागणी मुंबई उच्च न्यायालयात केली आहे.

याबाबत गुरुवारी सुनील शुक्ला याने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. यावेळी सुनील शुक्ला याने मुंबई उच्च न्यायालयानं दिशा प्रकरणी सीबीआयला चौकशी करण्याचे निर्देश द्यावेत, अशी विनंती केली आहे. तसेच यासंबंधित सुनीलने मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे.

दरम्यान, सुशांतच्या निधनाच्या पाच दिवस आधी दिशा सालियनने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली होती. याचप्रमाणे दिशा सालियनने काही काळ सुशांतसोबत काम केले होते. यामुळे सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाशी याचा काही संबंध आहे ? याचा तपास सुरु आहे.

मात्र या तपासावरच सुनीलनं गंभीर आरोप केला आहे. ‘मुंबई पोलिसांनी दिशा सालियनच्या मृत्यूचा तपास करताना अनेक बाबींचा विचार केलेला नसल्याचा गंभीर आरोप सुनीलने या याचिकेत केला आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या
आरारारारा! बाॅलीवूडची ‘ही’ स्टार अभिनेत्री म्हणतेय मला भूताने झपाटलय

आमिर खानच्या मुलीचा धक्कादायक खुलासा; १४ व्या वर्षी माझ्यावर लैं गिक अ त्याचार झाले होते

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.