सुंदरतेसोबतच व्यवसायामध्ये देखील खुप पुढे आहे सुनील शेट्टीची पत्नी; वर्षाला कमवते करोडो रुपये

सुनिल शेट्टी बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याने आजपर्यंत अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. ९० च्या दशकात तो यशाच्या शिखरावर होता. त्या काळात त्यांनी अक्षय कुमार आणि अजय देवगनसारख्या अभिनेत्यांला देखील चांगलीच टक्कर दिली होती.

सुनील शेट्टी त्यांच्या करिअरमध्ये १०० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. इंडस्ट्रीतील यशस्वी अभिनेते सुनील शेट्टी व्यवसायात देखील तेवढेच यशस्वी आहेत. त्यांनी अनेक ठिकाणी गुंतवणूक केली आहे. पण आज आम्ही तुम्हाला त्यांच्या पत्नीबद्दल सांगणार आहोत.

सुनील शेट्टीने माना शेट्टीसोबत लग्न केले होते. त्यांच्या पत्नी दिसायला खुपच सुंदर आहेत. मोठ्या मोठ्या अभिनेत्रींना त्या सुंदरतेमध्ये टक्कर देत असतात. सुंदरतेसोबतच त्या यशस्वी व्यवसायिका देखील आहेत. त्यांचा खुप मोठा व्यवसाय आहे.

पैसे कमवण्याच्या बाबतीत माना शेट्टी सुनील शेट्टीला देखील मागे टाकतात. म्हणून त्यांना इंडस्ट्रीमध्ये एक वेगळी ओळख आहे. सुनील शेट्टीची पत्नी असण्यासोबत त्या यशस्वी बिजनेस वुमन देखील आहेत. त्यांच्या बिजनेसच्या जगात स्वत ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

यशस्वी बिजनेस वुमन असण्यासोबतच त्या सामाजिक कार्यकर्त्या देखील आहेत. त्यांनी घर आणि व्यवसाय या दोन्हींमध्ये खुप चांगला समतोल बनवला आहे. त्यांनी एस २ नावाचा रिअल इस्टेट प्रकल्प सुरु केला आहे. या प्रकल्पांर्तगत त्यांनी मुंबईत २१ लक्झरी व्हिला बांधले आहेत.

६५०० चौरस फुटांपर्यंत त्यांचे व्हिले पसरलेले आहेत. त्यासोबतच त्या एका लाइफस्टाईल स्टोअर देखील चालवतात. एवढेच नाही त्या सेव्ह द चिल्ड्रेन नावाची स्वयंसेवी संस्थेशी संबंधित आहेत. वेळोवेळी त्या लोकांना मदत करत असतात.

सुनील शेट्टी आणि त्यांच्या पत्नीचे उत्पन्न मिळून त्यांचे वर्षांचे उत्पन्न करोडोंमध्ये जाते. म्हणून सुनील शेट्टी बॉलीवूडमधील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांपैकी एक आहेत. त्यांना पैशाची कोणतीही कमी नाही. कारण त्यांच्या पत्नी खुप चांगल्या बिजनेस वुमन आहेत.

महत्वाच्या बातम्या –
कटप्पाने बाहूबलीला का मारले ? या प्रश्नाच्या उत्तरासाठी ‘या’ मराठी अभिनेत्याला लाच देण्याचा प्रयत्न केला पण…
कपिल शर्मा फेम सुगंधा मिश्रा आणि संकेत भोसलेवर पोलिसांनी केला गुन्हा दाखल; वाचा संपुर्ण प्रकरण
कॉमेडी क्विन भारती सिंहची झाली फजिती; पहा व्हिडिओ
चित्रपटांपासून दुर राहून खुप आलिशान आयूष्य जगतेय राणी मुखर्जी; आहे करोडोंच्या संपत्तीची मालकिण

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.