मला अक्षयसारखे मार्केटींग जमत नाही म्हणून मी मागे राहीलो; सुनील शेट्टीने व्यक्त केली खंत

बॉलीवूडमध्ये अनेक असे अभिनेते आहेत ज्यांनी एकत्र त्यांच्या करिअरची सुरुवात केली. त्यातील अनेक अभिनेते यशाच्या शिखरावर पोहोचले तर काही अभिनेते अभिनेते काही खास कमाल करू शकले नाहीत. असेच एक अभिनेते म्हणजे सुनील शेट्टी. सुनीलने अक्षय आणि अजयसोबत त्याच्या करिअरची सुरुवात केली होती.

आजच्या घडीला अजय आणि अक्षय बॉलीवूडच्या मोठ्या अभिनेत्यांपैकी एक आहेत. पण सुनील मात्र फ्लॉप अभिनेता समजला जातो. त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांचे चित्रपट आजही लोकं पाहत असतात. त्यांचा अभिनय लोकांना खुप जास्त आवडतो.

पण गेल्या १२ वर्षांपासून सुनील शेट्टी मोठ्या पडद्यावरुन गायब आहेत. तर दुसरीकडे अक्षय आणि अजय सध्या बॉलीवूडवर राज्य करत आहेत. त्यांचे दरवर्षी नवनवीन चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतात. सुनील शेट्टीने पण त्यांच्यासोबतच करिअरची सुरुवात केली होती. मग आज स्टार का नाहीत? असा प्रश्न अनेकांना पडतो.

या प्रश्नाचे उत्तर स्वतः सुनील शेट्टीने एका मुलाखतीमध्ये दिले आहे. सुनील शेट्टीला विचारण्यात आले की, अक्षय अजयसोबत करिअर सुर करुन पण आज तुम्ही त्यांच्या पेक्षा मागे का आहात. यावर त्यांनी अनेक खुलासे केले होते.

सुनील शेट्टीने सांगितले की, ‘आम्ही एकत्र करिअर सुरू केले होते. अनेक गोष्टींमध्ये ते माझ्या पेक्षा पुढे होते आणि आजही आहेत. खास करुन मार्केटिंगमध्ये. मी कधीच मार्केटिंगचा जास्त वापर केला नाही आणि तीच माझी मोठी चुक झाली’.

त्यांनी पुढे सांगितले की, ‘मी एकाच दिग्दर्शकासोबत अनेक वेळा काम केले तर ते लोकांना अवडणार नाही. त्यांना वाटेल माझ्याकडे चॉईस नाही. अशा अनेक गोष्टी आहेत. आजच्या घडीला कोणताही निर्माता सुनील शेट्टीसोबत ५०० करोडचा चित्रपट करण्याची रिस्क घेणार नाही. पण अजय अक्षयसोबत ते ही रिस्क घेतील’.

सुनील शेट्टीने १९९२ मध्ये रिलीज झालेल्या ‘बलवान’ चित्रपटातून अभिनयाची सुरुवात केली होती. याच काळात अक्षय आणि अजयने पण बॉलीवूडमध्ये डेब्यु केला होता. बलवान हा चित्रपट चांगलाच हिट झाला होता. त्यानंतर ‘दिलवाले’ हा चित्रपट सुपरहिट झाला.

सुनील शेट्टीला बॉलीवूडमध्ये खुप जास्त यश मिळाले. त्यामूळे त्याने कधीच मागे वळून पाहीले नाही. तो एकापेक्षा एक हिट चित्रपटांमध्ये काम करत होता. काही काळातच तो यशाच्या शिखरावर जाऊन पोहोचला. यशस्वी अभिनेत्यांच्या यादीत त्याच्या नावाचा समावेश होत होता. पण आज ते बॉलीवूडपासून लांब आहेत.

सुनीलने दिलवाले, कृष्णा, आगाज, विनाशक, मोहरा, गोपी किशन, सपूत, भाई, धडकन, हेरा फेरी, दे दना दन यांसारख्या अनेक हिट चित्रपटामध्ये काम केले. २००८ साली रिलीज झालेल्या हम सिंकदर चित्रपटामध्ये दिसला होता. त्यानंतर तो आत्ता परत कमबॅक करत आहे.

महत्वाच्या बातम्या –
गर्लफ्रेंड घरी यायची आणि पत्नीसोबत मिळून माझ्यासाठी जेवण बनवायची; रवी किशनचा गौप्यस्फोट
अहमदनगरच्या एका खेड्यात जन्मलेले सदाशिव अमरापूरकर कसे बनले बॉलीवूडचे खतरनाक खलनायक?
‘येऊ कशी तशी नांदायला’ मालिकेतील ओमचे खऱ्या आयुष्यातील घर आहे खुपच आलिशान; पहा फोटो
‘कांटा लगा’ गाण्यातील अभिनेत्रीची आज झालीय ‘अशी’ अवस्था; ओळखणे देखील आहे कठिण

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.