Share

नेटकऱ्याने चुकून सुनील शेट्टीलाच म्हटले गुटखा किंग; संतापलेल्या सुनीलने ट्विटरवरच झापले, म्हणाला, तुझा चष्मा…

काही दिवसांपूर्वी अभिनेता अक्षय कुमार, शाहरुख खान आणि अजय देवगण यांना तंबाखूच्या जाहिरातीवरून खूप ट्रोल करण्यात आले होते. यावेळी लोकांनी अभिनेता अक्षय कुमारच्या(Akshay Kumar) विरोधात प्रतिक्रिया दिल्या होत्या. त्यानंतर अभिनेता अक्षय कुमारने या जाहिरातीबद्दल सोशल मीडियावर पोस्ट करत माफी मागितली होती.(sunil shetty angry  tweeter user tagging wrong tweet)

लोकांच्या विरोधामुळे अभिनेता अक्षय कुमारला या जाहिरातीमधून माघार घ्यावी लागली होती. हे प्रकरण अजूनही संपलेलं नाही. यावर ट्विटरवर अजून देखील चर्चा होतं आहे. नुकताच एका युजरने सोशल मीडियावर अभिनेता अक्षय कुमार, शाहरुख खान आणि अजय देवगण यांच्या तंबाखूच्या जाहिरातीचा होर्डिंगचा फोटो ट्विट केला आहे.

या ट्विटमध्ये युजरने या तीन सुपरस्टार्सवर टीका केली आहे. पण चुकून युजरने ट्विट करत असताना अभिनेता अजय देवगण ऐवजी सुनील शेट्टीला टॅग केले आहे. या ट्विटवर अभिनेता सुनील शेट्टीने युजरला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. त्यानंतर युजरला अभिनेता सुनील शेट्टीची माफी मागावी लागली आहे. सध्या या ट्विटची जोरदार चर्चा होत आहे.

युजरने ट्विटमध्ये लिहिले आहे की, “या हायवेवर इतक्या जाहिराती पाहिल्या की आता गुटखा खावासा वाटत आहे.” युजरने ट्विटमध्ये सुनील शेट्टीला चुकून टॅग केले आणि पुढे लिहिले की, “हॅलो #GutkaKingsofIndia शाहरुख, अक्षय आणि सुनील. तुमच्या मुलांना तुमची लाज वाटली पाहिजे की तुम्ही देशाला चुकीच्या मार्गाने पुढे नेत आहात”, असे युजरने ट्विटमध्ये लिहिले आहे.

“चुकीच्या मार्गाने देशाचे नेतृत्व केल्याबद्दल तुम्हाला लाज वाटली पाहिजे. भारताला कर्करोग देश बनवण्याच्या दिशेने प्रयत्न करू नका”, अशा शब्दात युजरने अभिनेत्यांवर टीका केली आहे. यावर उत्तर देताना अभिनेता सुनील शेट्टीने लिहिले आहे की, “भाऊ, तुझा चष्मा नीट करून घे किंवा बदलून आण.” यासोबतच अभिनेता सुनील शेट्टीने हात जोडणारा इमोजी देखील शेअर केला आहे.

 

यावर युजरने अभिनेता सुनील शेट्टीची माफी मागितली आहे. तसेच आपण त्याचा चाहता असल्याचे देखील सांगितले आहे. “हॅलो सुनील शेट्टी. मला माफ करा. तो mistag होता. माझा हेतू तुम्हाला दुखवण्याचा नव्हता.” यासोबत युजरने हात जोडलेला एक इमोजी देखील शेअर केला आहे. चाहत्यांनी तंबाखूची जाहिरात न केल्याबद्दल अभिनेता सुनील शेट्टीचे कौतुक केले आहे.

महत्वाच्या बातम्या :-
भाजप खासदार ब्रिजभूषण सिंगांचे खळबळजनक वक्तव्य; म्हणाले, बाळासाहेबांनी उत्तर प्रदेशची…
नव्या ‘डिव्हिलियर्स’चा आयपीएलमध्ये दबदबा; लोक म्हणाले, ‘हा कॉमेंटेटर भारताला वर्ल्डकप जिंकून देणार’
शोरमा खाणं टाळा तो काही भारतीय खाद्यपदार्थ नाही; आरोग्यमंत्र्यांचे नागरिकांना आवाहन

 

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now