मुंबई | राज्य अगोदरच कोरोनच्या संकटाशी सामना करत आहे, अशातच आता नवीन संकट उभं राहिलंय, ते बर्ड फ्लूच्या रूपात. परभणीच्या मुरुंबा गावातील ८०० पेक्षा जास्त कोंबड्यांचा मृत्यू हा बर्ड फ्लूनेच झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे. परभणीतील घटनेनंतर प्रशासनाने पावलं उचलायला सुरुवात केली आहे.
परभणीतील घटनेनंतर जिल्हा प्रशासनाने पावलं उचलायला सुरुवात केली आहे. चिकन, अंडी खाणार असाल तर 70 डिग्री सेल्सिअस तापमानावर अर्धा तास चिकन, अंडी शिजवा आणि मगच खा, असा सल्ला राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी राज्यातील जनतेला दिला आहे.
ते म्हणतात, ‘अंडी किंवा कोंबडी यांना आपण विशिष्ट तापमाणावर अर्धातास जर शिजवलं, तर त्यातील जीवाणू मरून जातो. हे शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झालेलं आहे. म्हणून जनेतला एवढंच सांगणं आहे की, अंडी किंवा चिकन अर्धा तास ७० डिग्री अंशावर शिजवलं पाहिजे. असे केल्यास त्यामधील जीवाणू मरून जातात, जे तुमच्यासाठी सुरक्षित असेल.’
दरम्यान, कोरोना संकटाच्या काळात चिकनमधून कोरोना होत असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. मात्र बर्ड फ्ल्यूबाबतच्या चुकीच्या अफवा पसरवून पोल्ट्री व्यवसाय अडचणीत आणण्याचा प्रयत्न कुणीही करू नये. अशा प्रकारच्या अफवा पसरविणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.
८०० कोबड्यांचा ‘बर्ड फ्लू’ने मृत्यू…
परभणीच्या मुरुंबा गावातील ८०० पेक्षा जास्त कोंबड्यांचा मृत्यू हा बर्ड फ्लूनेच झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुरूंबा येथे ही घटना घडली असून, परभणीचे जिल्हाधिकारी डी.एम. यांनी याविषयीची माहिती दिली आहे.
देशातील सहा राज्यांमध्ये बर्ड फ्लूने थैमान घातलेले असतानाच परभणी जिल्ह्यातील मुरूंबा गावात एकाच दिवशी ८०० कोंबड्या मरण पावल्याची घटना घडली. ज्या पोल्ट्री फॉर्ममध्ये ही घटना घडली. तो बचत गटाच्यावतीने चालवला जातो. पोल्ट्री फॉर्ममध्ये ८००० हजार कोंबड्या असून, त्यापैकी ८०० कोंबड्या मरण पावल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
जोड्याने मारलं नाही तर नाव सांगणार नाही; संजय राऊतांचा सोमय्यांना जाहीर इशारा
डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विटर अकाउंट बंद करण्याच्या निर्णयामागे आहे ‘ही’ भारतीय महिला
‘राज ठाकरेंच्या जीवाला पाकिस्तानी दहशतावाद्यांकडून धोका’