…अन् उठल्यावर बघतो तर काय तीन हिंस्त्र चित्ते त्याच्याबाजूला झोपलेले; पहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ

सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ अपलोड होत असतात. त्यातले काही व्हिडिओ चांगलेच व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ हे कॉमेडी असतात, तर काही व्हिडिओ हे अंगाचा थरकाप उडवणारे असतात.

आता असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तीन हिंस्त्र चित्ते दिसून येत आहे. ते एका माणसाच्या शेजारी झोपलेले आहे. हे चित्ते त्या माणसाचे पाळीव असावे असे दिसून येत आहे. पण हा व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप नक्कीच उडतो.

काही लोकांना प्राणी पाळण्याचा खुप शौक असतो, त्यामुळे लोक वेगवेगळे प्राणी पाळताना आपल्याला दिसत असतात. कुत्रा, मांजरच नाही, तर काही लोक वाघ, सिंह आणि चित्त्यासारखे भयानक प्राणीही पाळतात.

सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की तीन चित्ते आपल्या मालकाबरोबर झोपलेले आहे. एखादा प्राणी कितीही धोकादायक असला आणि त्याला प्रेम दिले तर तो आपल्या मालकाशी प्रामाणिक राहतो असे या व्हिडिओमधून आपल्याला दिसून येते.

रात्रीच्या थंडीत हा माणूस चित्त्यांसोबत झोपलेला दिसून येत आहे. त्यावेळी त्या माणसाला अचानक जाग येते आणि तो बघतो की एका चित्त्याला थंडी वाजत आहे, तर तो लगेच त्या चित्त्याला आपल्या कुशीत घेतो आणि झोपी घालतो.

हे सर्व बघून दुसरा चित्ता उठतो आणि मालकाच्या पायाजवळ झोपतो, त्यानंतर तिसरा चित्ताही उठतो आणि आपल्या मालकाजवळ येऊन झोपतो. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. प्रसिद्ध कॉमेडियन सुनील ग्रोवरने हा व्हिडिओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेच्या टीमने कोकणवासियांसाठी केली कळकळीची विनंती; व्हिडिओ पाहून येईल डोळ्यात पाणी
इंडियन आयडॉल १२ च्या या आठवड्यात दोन स्पर्धक होणार एलिमिनेट? नाव ऐकून व्हाल चकित..
मनोज बाजपेयीचा अभिनय पाहून २ सिनियर अभिनेत्रींनी पडल्या होत्या त्याच्या पाया; नाव वाचून हैराण व्हाल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.