…म्हणून राॅकीच्या प्रिमियरला सुनील दत्त हातात पत्नी नर्गिसचा फोटो घेऊन आले होते

बॉलीवूडमध्ये अनेक यशस्वी अभिनेत्री झाल्या. पण नर्गिस यांची जागा कोणी घेऊ शकत नाही. त्यांचा मृत्यू होऊन अनेक वर्ष झाली. पण तरीही त्यांची जागा दुसरी कोणतीही अभिनेत्री घेऊ शकली नाही. हिंदी फिल्म इंडस्ट्रीतील सर्वात यशस्वी, सुंदर आणि प्रभावशालि अभिनेत्री म्हणून त्यांना ओळखले जाते.

नर्गिस यांनी अभिनेते सुनील दत्तसोबत लग्न केले होते. दोघांना इंडस्ट्रीतील पावर कपल म्हणून ओळखले जाते. दोघांच्या जोडीला चाहते खुप पसंत करत होते. पण हे दोघे जास्त काळ एकत्र चाहत्यांना दिसले नाहीत. नर्गिसला कॅन्सर झाला आणि त्या हे जग सोडून गेल्या.

नर्गिसच्या मृत्यूनंतर सुनील दत्त आणि त्यांच्या कुटूंबाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. नर्गिस यांना वाचवण्यासाठी सुनील दत्तने खुप प्रयत्न केले होते. दिवस रात्र एक करुन ते नर्गिसची सेवा करत होते. पण शेवटी त्यांना अपयश मिळाले.

सुनील दत्त नर्गिसला वाचवण्यासाठी अनेक प्रयत्न करत होते. त्यांच्या कॅन्सरच्या उपचारासाठी ते त्यांना न्यूयॉर्कला घेऊन गेले होते. उपचारादरम्यान नर्गिला खुप त्रास व्हायचा. त्यांना या त्रासापासून वाचवण्यासाठी डॉक्टरांनी सुनील दत्तला त्यांचा सपोर्ट सिस्टिम बंद करायला सांगितले होते.

२ ऑगस्ट १९८० ला नर्गिसची तब्येत अचानक खराब झाली होती. सुरुवातीला वाटत होते छोटा आजार आहे. त्या लवकरच बऱ्या होतील. पण नंतर समजले की, त्यांना कॅन्सर झाला आहे. त्यामूळे संपूर्ण दत्त कुटूंबालाच धक्का बसला होता. सुनील दत्तला काहीही कळत नव्हते.

सुनील दत्त जास्त उशीर न करता नर्गिसला उपचारासाठी न्यूयॉर्कला घेऊन गेले. उपचारा दरम्यान नर्गिसची किमो थेरपी देखील व्हायची. त्यामूळे त्यांना खुप त्रास होत होता. कधी कधी तर त्रासामूळे त्या रात्ररात्रभर जागी राहायच्या. त्यांचा हा त्रास सुनील दत्तला देखील बघवत नव्हते.

नर्गिसचा त्रास पाहून सुनील दत्तला खुप त्रास होत होता. म्हणून ते नर्गिस लवकर बऱ्या होण्यासाठी प्रार्थना करत होत्या. पण उपचारा दरम्यान नर्गिस कोमात गेल्या. त्यावेळी डॉक्टरांनी सुनील दत्तला सल्ला दिला होता की, त्यांनी नर्गिसचा लाईफ सपोर्ट सिस्टिम काढून टाकावा.

ज्यामूळे नर्गिसला त्रास होणार नाही आणि त्या शांततेत मरतील. पण सुनील दत्तला पुर्ण विश्वास होता की, नर्गिल लवकरच कोमातून बाहेर येतील. त्या लवकरच बऱ्या होतील. सुनील दत्तच्या प्रार्थनांनी काम केले. नर्गिस कोमातून बाहेर आल्या. त्या बऱ्या होऊ लागल्या होत्या.

त्यावेळी संजय दत्तचा पहीला चित्रपट ‘रॉकी’ रिलीज होणार होता. ८ मे ला या चित्रपटाचा प्रिमियर होता. नर्गिसने या प्रिमियरसाठी तयारी केली होती. त्यांना मुलाचा पहीला चित्रपट बघायचा होता. पण त्यांचे हे स्वप्न कधीच पुर्ण होऊ शकले नाही.

३ मे ला अचानक नर्गिस यांची तब्येत बिघडली आणि त्या हे जग सोडून गेल्या. त्यांचे निधन दत्त कुटूंबासाठी खुप मोठा धक्का होता. ८ मे ला रॉकी चित्रपटाच्या प्रिमियरला सुनील दत्त हातात नर्गिसचा फोटो घेऊन चित्रपट पाहायला आले होते. हे दृश्य पाहून सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आले होते.

महत्वाच्या बातम्या –
ट्विंकल खन्नामूळे करणं जोहरने त्याचा जीव धोक्यात घातला होता; वाचा पुर्ण किस्सा
‘जुबेदा’ चित्रपटानंतर करिश्मा कपूरचे कौतूक झाले तर मनोज बाजपेयीला सावळ्या रंगामूळे ठेवण्यात आली नाव
मराठी सिनेसृष्टीत पुन्हा शोककळा! ‘फत्तेशिकस्तच्या’ मावळ्याचे कोरोनाने निधन
पंगा क्वीन कंगणा राणावतचं ट्विटर अकाऊंट कायमचं सस्पेंड; वादग्रस्त विधान केल्याने ट्विटरची कारवाई

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.